हर हर महादेव! काय ते दिल्लीला दाखवावेच लागेल – उद्धव ठाकरे

 

  • हिंदुत्व आता खरं धोक्यात आहे, हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढले ते आता इंग्रजांची तोडा फोडा राज्य करा निती वापरतील
  • मराठी अमराठी वेगळे करतील व वर बसून सत्तेची गाजरं करतील, मराठी अमराठी हा भेद विसरून हिंदुची एकी करूया
  • लढाई न पाहल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व राहिलेलं नाही, आपले सैनिक सीमेवर कसे राहतात, मी तिथे अशी दालनं करणार आहे जिथे थंड वातावरण करून सैनिक कशाप्रकारचे कपडे घालतो ते कपडे घालून तिथे उभे राहायचं, रणगाडे चालवताना कसं वाटतो ते दाखवायच आहे, जो जवान सरहद्दीवर उभा राहतो तो कसा राहतो ते दाखवायचं आहे
  • मुंबईत महाविकास आघाडीचे सकार मराठी भाषा भवन सुरू करतंय, संभाजीनगरला संतपीठ करतोय, रेवज ते रेड्डी सिमेटचा करतोय चौपदरीकरण करतोय, मराठी नाटकाचा इतिहास सांगणारं दालन करतोय, वरळीला जागतिक मत्सालय करतोय, धारावीत जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र करणार आहोत, मुंबईत लष्कराचं संग्रहालय करतोय.
  • चीन मधून बऱ्याचशा कंपन्या बाहेर पडतायत, त्यांना  महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मराहाष्ट्राला बदनाम करतायत, कुठे फेडणार ही पाप?
  • आपला देश जगातील सर्वात तरुण देश ओळखला जातो, युवाशक्ती आपल्याकडे मोठी आहे. युवाशक्ती मी दोन प्रकारे पाहतो, या युवाशक्तीला नोकरी मिळाली नाही तर तो एक बॉम्ब आहे. नोकरीशिवाय जर हे युवा चुकीच्या दिशेने गेले तर त्यासाठी आपण जबाबादार असू.
  • मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातचा निधी साडे तीनशे टक्क्यांनी वाढला, हे कॅगचे ताशेरे आहे, तिकडे कुणाची ढुंकून बघायची हिंमत नाही
  • जणू काही संपूर्ण जगात माझ्या महाराष्ट्रातच गांजाचं व्यसन जास्त चाललं आहे असं चित्र दाखवलं जातंय, का असा नतद्रष्टपणा करताय? मुंद्रा अदानी बंदराचा तपास करा असं कोर्टाने सांगितलं आहे.
  • केंद्रीय मंत्री सोनवाल यांचा फतवा, 11 बंदरांचा सीएआर 75 टक्के गुजरातकडे वळवला
  • मार्मिकेमध्ये एक सदर होतं ‘वाचा आणि थंड बसा’, भूमिपुत्रांचे हक्क हिरावले जात होते त्यावर ते सदर होतं
  • सत्तेची चटक व्यसन ते सर्वात वाईट आहे, ते घरदार उद्ध्वस्त करतं
  • आणीबाणी, परकीय आक्रमण आणि विदेशासोबत संबंध कसे असावेत याबाबतीतच केंद्राने राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करावा, याव्यतिरिक्त जर हस्तक्षेप झाला तर ते घटनाबाह्य ठरेल, यावर कुणी चर्चा करेल का? घटनेने आम्हाला सार्वभौमत्त्व केंद्राएवढंच दिलं असेल तर केंद्राची लुडबूड खपवून घेणार नाही
  • अमृतमहोत्सव आहे तर अमृतमंथन करा, आपण काय कमावलं काय गमावलं यावर चर्चा झाली पाहिजे, महिलांवरील अत्याचारांवर चर्चा झाली पाहिजे
  • कधी कोणत्याही आंदोलनात नव्हते, स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. फक्त भारत माता की जय, वंदे मातरम ओरडायचं, म्हणजे देशभक्ती नाही
  • जसे सैनिक सीमेवर लढतो तसेच महाराष्ट्र पोलीसही लढतो, मला अभिमान आहे त्यांचा. तुम्हाला शिमगा करायला अडवलं म्हणून आमचा पोलीस माफिया.
  • 26 नोव्हेंबर कुणीच विसरू शकत नाही, ओंबळे गेले, करकरे कामटे गेले. ज्यावेळी अतिरेकी घुसलेले त्यावेळी जे पोलीस लढत होते त्यांचे कौतुक करायचे की त्यांना माफिया म्हणायचे.
  • संपूर्ण देशात ही समस्या आहे, कायदा करायचा, कडक शासन करायचा तर ते आम्ही करतो आहोत. पण महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते, महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला तर उत्तर प्रदेशमध्ये काय होतंय?
  • आम्हाला माताभगिनींचा सन्मान कसा करायचा याची शिकवण आहे, ती घटना घडल्यानंतर अर्ध्या तासात त्याला अटक झाली. आता औपचारिकता बाकी आहे नाहीतर त्या नराधमाला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही
  • तुमच्या पक्षाची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही, तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून शिवसैनिक भ्रष्ट नाही
  • आम्ही पालखीचे भोई आहोत, ती हिंदुत्व राष्ट्रभक्तीची पालखी आहे.
  • तेव्हा शिवसेनाप्रमुख रस्त्यावर उतरले होते व त्यांनी म्हटले की गर्व से कहो हम हिंदू है.
  • जे आज छाती पुढे काढून सांगतात ते बाबरी पाडल्यानंतर लपून बसले होते
  • ज्या रंगाची गोळी माझ्या शरीराला शिवून जाईल तो रंग आम्ही पुसू टाकू, असा इशारा दिला होता
  • हिंदुत्वाला धोका नाही हे आजचं सत्य नाही तर जेव्हा धोका होता तेव्हा एकच मर्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासमोर उभे होते
  • माय मरो आणि गाय जगो असे मी म्हटलो होतो
  • हिंदुत्वाला धोका नाही असं म्हणतात, पण आता खरंच हिंदुत्व धोक्यात आहेत. या उपटसुंभांमुळे हिंदुत्व धोक्यात आहे
  • 92-93 साली शिवसैनिक उतरला नसता तर ही तोंडात बोंडकं घातलेली माणसं कुठे असती माहित तरी असतं
  • देशाच्या अमृतमहोत्वस सुरू आहे, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल या लढ्यात पुढे होते, लाल बाल पाल, बंगालने त्यांचं कर्तुत्व दाखवलं आहे, आम्ही देखील दाखवून देऊ, हर हर महादेव काय असतो ते दाखवायची गरज आली तर दाखवून देऊ
  • पुढच्या महिन्यात आपल्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील, अजूनही बोलतात की हे सरकार पडेल, मी म्हणतो पाडून दाखवा
  • सध्या खेळ सुरू आहे, व्यसनाधिनता आहे, बाजार समित्यांपासून लोकसभेपर्यंत सगळं माझ्या हाताखाली पाहिजे, सत्तेचं व्यसन आहे, हे देखील एक व्यसन आहे
  • सर्व सामान्य माणसाला मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला सर्वात महत्त्वाचं शस्त्र दिलं आहे ते मत
  • मोहन भागवत म्हणतात की सर्वांचे पूर्वज एक होते, तर लखीमपूरला जे शेतकरी मारले गेले त्यांचे पूर्वज वेगळे होते का?
  • पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जगायला येतो. नंतर त्याला जात पात धर्म चिकटतो, त्यामुळे जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा हा देश आमचा धर्म आहे ही आमची शिकवण आहे, कुणी या आमच्या शिकवणीच्या आडवे आले तर कडवट राष्ट्रभिमानी म्हणून समोर उभे राहू
  • आपण जे सांगतोय ते आपलीच माणसं ऐकणार नसतील तर ही मेळाव्याची थोतांड कशाला करायचे
  • हिंदुत्व म्हणजे काय, मोहनजी माफ करा मी तुमच्यावर टीका करतोय असे समजू नका
  • झोळी वगैरे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत
  • जर त्यांनी वचन पाळलं असतं तर कदाचित मी यातून बाजूला झालं असतं
  • तुम्ही मुख्यमंत्री राहिला असतात पण शिवसेनेला दिलेला वचन मोडलं, माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं, ते अजून पूर्ण झालेलं नाही, एक दिवस शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखविन
  • हिंदुत्व म्हणून भाजपशी युती केली होती
  • आज दोन मेळावे असतात, एक आरएसएसचा आणि एक आपला
  • आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं हे मर्दाचं लक्षण नाही
  • ही काय लायकीची माणसं आहेत, ती आमच्या अंगावर येतात, आम्ही तुमच्य़ा अंगावर कशाला येऊ काय लायकीची तुम्ही माणसं आहेत
  • पेहेले तो मुझे निंद की गोली खाके भी नींद नही आती थी फिर किसेने कहाँ भाजप मे जाओ, अब मे कुंभकरण जैसे सोता हूँ
  • हर्षवर्धन पाटील अनाहूतपणे बोलून गेले की भाजपात का गेलो
  • तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे, तुमची डोकी फुटतील, पण माझ्या वाड्याला काही होणार नाही
  • एक विकृती हल्ली आहे, ठाकरे कुंटुंबीयांवर हल्ला करा. पण अजून असा मायकेलाल जन्माला आलेला नाही जो ठाकरे कुटुंबीयांवर हल्ला करेल
  • हे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना व त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं
  • पद येतील, पद जातील, सत्ता येईल सत्ता परत जाईल पण अहमपणा कघधीट ड़ोक्यात जाऊ देऊ नको
  • काही जण बोलतायत की मी पुन्हा य़ेईन ते आता बोलतायत की मी गेलोच नाही
  • मी त्यांच्या घरातलाच कुणी आहे. मोठा भाऊ आहे असं वाटलं पाहिजे
  • मी मुख्यमंत्री आहे असं कधीही वाटू नये, माझ्या तमाम जनतेला सुद्धा असं वाटू नये
  • आपल्यावर फुलं उधळली कारण आपण माझी शस्त्र आहात
  • जी प्रथा शिवसेनाप्रमुखांनी 66 वर्षापूर्वी सुरू केली ती आजही आपण सुरू केली आहे
  • आवाज आपला कुणी दाबू शकत नाही, आवाज आजच नाही तर कधीच दाबू शकत नाही, आवाज दाबणारा जन्माला आलेला नाही
  • जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो
  • शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
  • उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन
  • शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला हार घातला.
  • उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात दाखल

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष
  • शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह
  • शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
  • शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा सायंकाळी साडेसहा वाजता षण्मुखानंद सभागृहात