IPL 2024 : पराभव झाला तरी विक्रम केला, ‘असं’ करणारी हैदराबाद ठरली इतिहासातील पहिली टीम

सनराझर्स हैदराबादचा संघ यंदाच्या मोसमात तुफान फॉर्मात दिसत आहे. एकाच सिझनमध्ये दोन वेळा हैदराबादने त्यांचाच सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडित काढला. मात्र त्यांच्या विजयी रथाला विराट कोहलीच्या बंगळुरूने लगाम लावला. आरसीबीविरुद्ध हैदाराबदाचा 35 धावांनी पराभव झाला असला तरी हैदराबादने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.

25 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सामन्यात फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे हैदराबादला 35 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा एक सामना सोडला तर मागील सर्व सामन्यांमध्ये हैदराबाच्या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला आहे. फलंदाजांच्या या आक्रमक पवित्र्यामुळेच हैदराबाचा संघ एकाच हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ बनला आहे. विशेष म्हणजे हैदाराबादने आपल्या आठव्याच सामन्यामध्ये हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

पराभवाचा मास संपला! एक महिना आणि पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरूचा विजय

हैदराबादने बंगळुरूविरुद्ध षटकारांच षतक पूर्ण केले मात्र त्यांना पराभावाचा सामना करावा लागला. हैदराबाचा या हंगामातील हा तिसरा पराभव ठरला. अजून काही सामने बाकी आहेत त्यामुळे षटकारांची संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2022 मध्ये हैदराबादने 97 षटकार ठोकले होते. मात्र त्यांना षटकारांच शतक पूर्ण करता आले नाही.