संदेशखळी हिंसाचार प्रकरण : पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी सीबीआयचे छापे

संदेशखळी हिंसाचार प्रकरणी पहिला एफआयआर नोंदवल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये अनेक ठीकाणी सीबीआयचे छापे मारले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, संदेशखळीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केला होता. त्यामध्ये शेख शागजहा आणि अन्य आरोपींच्या विविध ठिकाणांवर सीबीआय छापे मारत आहे.

पॅरामिलीट्री फोर्सच्या कडक सुरक्षेखाली पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहे. बोललं जात आहे की, या छाप्यामध्ये मोठ्या संख्येने देशी-विदेशी हत्यारे सापडली आहेत, ज्यामध्ये विदेशात बनलेल्या हत्यारांची संख्या अधिक आहे.

संदेशखळी हिंसाचार प्रकरणी पहिला एफआर नोंदवण्यात आला. सीबीआयने ईमेलच्या माध्यमातून आलेल्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरमध्ये पाच नामवंत लोकांचा समावेश असून बाकी अज्ञात लोक आहेत. महिलांचा लैंगिक छळ आणि जमिनी बळकावणे या प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयच्या 10 जणांच्या पथकाने मागच्या आठवड्यात संदेशखळी येथे जाऊन पाहणी केली. दरम्यान तिथे जाऊन पीडित कुटुंबं आणि महिलांशी बोलून त्यांची जबाब नोंदवण्यात आले होते. यासोबतच सीबीआयचे एक पथक संदेशखळी पोलीस स्टेशनला पोहोचले, तिथे उपस्थित पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला होता.