T-20 World Cup 2024 : ‘या’ दोन खेळाडूंनी चांगला खेळ केलाच पाहिजे, युवराज सिंगचं परखड मत

जूनमध्ये टी-20 विश्वचषकाचा थरारा सुरू होणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या अनेक माजी खेळाडूंनी 15 संभाव्य खेळडूंची नावे सुद्धा जाहीर केली आहेत. सर्वच खेळाडूंनी आपल्या संभाव्य संघाच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान दिले आहे. मात्र आात सिक्सर किंग युवराज सिंगने टीम इंडियाच्या बाबतीत एक मत व्यक्त केले आहे.

टी-20 विश्वचषक म्हंटल की युवराज सिंगचे नाव सर्वांच्या तोंडी आल्याशिवाय राहत नाही. 2007 च्या विश्वचषकात त्याने इंग्लडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंमध्ये ठोकलेले सहा षटकार आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. 2007 चा विश्वचषक महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने उंचावला. मात्र या विश्वचषकात युवराज सिंगने केलेली कामगिरी महत्त्वाची होती. 2024 च्या टी-20 विश्वचषकात युवराज सिंग ब्रँड अँम्बेसेडर म्हणून सहभागी होणार आहे. युवराजने सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या दोन खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांनी चांगली कामगिरी केली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

“सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा महत्वाता खेळाडू आहे. 15 चेंडूंमध्ये सामना बदलण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे हा टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी सूर्या महत्त्वाचा ठरणार आहे. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह देखील एक महत्वाचा खेळाडू आहे. तसेच संघात युजवेंद्र चहलसारखा लेग-स्पिनर पाहायला आवेडल कारण त्याची गोलंदाजी खरोखरच चागंली आहे. पण मी एक फलंदाज आहे. त्यामुळे मी म्हणेन की, सूर्यकुमार यादव हा मुख्य खेळाडू आहे,” अस परखड मत युवराज सिंगने व्यक्त केले.

“डीके चांगली फलंदाज करत आहे. 2022 च्या विश्वचषकासाठी त्याची निवड करण्यात आली होती. मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही. रिषभ पंत व संजू सॅमसन दोघेही चांगल्या फॉर्मात आहेत,” असे युवराज सिंग म्हणाला.