घर घेणाऱयांना आता टीडीएस लागणार नाही; आयकर विभागाचा सर्वसामान्यांना दिलासा

16 हजार जणांना नोटिसा

गतवर्षी आयकर विभागाने देशभरातील 16 हजारांहून अधिक घर खरेदीदारांना नोटीस पाठवून मालमत्तेवर अतिरिक्त टीडीएस भरण्याचे आदेश दिले होते. या मालमत्ता विकणाऱयांचे पॅन कार्ड एकतर निष्क्रिय आहेत किंवा आधार क्रमांकाशी लिंक नसल्याचे आयकर विभागाने आपल्या निवेदनात म्हटले. अशा स्थितीत, मालमत्ता खरेदी करणाऱयाला अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार होता.

घर विकणाऱयाकडे पॅन कार्ड नसणे किंवा निष्क्रिय असल्याचे परिणाम मालमत्ता खरेदीदारांना भोगावे लागतात. अशा स्थितीत घर खरेदीदारांना आयकर विभागाने तात्काळ टीडीएस कपातीतून काहीसा दिलासा दिला असून यासाठी 31 मे 2024 पर्यंत विव्रेत्याने आपले पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. विक्रेत्याने आधार क्रमांक आणि पॅन कार्ड लिंक केल्यास गृह खरेदीदाराला वाढीव दराने अतिरिक्त टीडीएस भरावा लागणार नाही. आयकर विभागाच्या अलिकडच्या परिपत्रकाद्वारे, मालमत्ता विव्रेत्याने 31 मेपर्यंत त्यांचा पॅन आणि आधार लिंक केला असेल तर घर खरेदीदारांना टीडीएस कपातीवरील कर सूचनेच्या दायित्वापासून दिलासा मिळेल.