Lok Sabha Election 2024 – सोलापुरात पेट्रोल ओतून EVM मशीन जाळण्याचा प्रयत्न, मतदान केंद्रावर गोंधळ

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी लोक मोठ्या प्रमाणात मतदान करायला घराबाहेर पडले असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र याला गालबोट लागले. सोलापूर मतदारसंघातील सांगोला येथे एका तरुणाने EVM मशीन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला आणि काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवावी लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

संगोलांधील बागलवाडी येथील बुथ क्रमांक 86 वर दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असताना एक तरूण एक मराठा, लाख मराठा घोषणाबाजी करीत मतदान केंद्रात घुसला. त्यानंतर त्याने मतदान यंत्र हातात घेत पेट्रोल ओतले अन् पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मशीन बंद पडली.

दरम्यान, या घटनेमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबविण्यात आली. उपस्थित मतदान केंद्रावरील पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतले. त्यानंतर तासाभरात दुसरे मतदान यंत्र मशीन आणून पुन्हा पहिल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू केली.