मसाल्यांमध्ये अॅसिड, सडलेले तांदूळ, भुसा! दिल्लीत पोलिसांची कारवाई, 15 टन बनावट मसाले जप्त

जिभेची चव वाढवण्यासाठी जेवणात मसाले वापरण्यात येतात. परंतु, हे मसाले किती सुरक्षित आहेत हे पडताळून पाहण्याची गरज आता वाटू लागलीय. कारण दिल्लीत तब्बल 15 टन बनावट मसाले, सडलेले तांदूळ हस्तगत केले. हे मसाले अॅसिडमध्ये तयार करण्यात येत होते. मोठय़ा ब्रॅण्डच्या नावाने कारखान्यांकडून बनावट मसाले तयार करण्यात येत असल्याची आणि उत्तर पूर्व दिल्लीतील काही दुकानदार या मसाल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी कारखान्यांवर धाडी टाकल्या. या कारवाईत दिलीप सिंह (46), सरफराज (32) आणि खुर्शीद मलिक (42) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

मसाल्यांमध्ये काय?

चौकशीत दिलीप सिंह आणि सरफराजने 2021 मध्ये बनावट मसाले तयार करणारे कारखाने सुरू केले. दोघेही पूर्वी कपडे विक्रीचा व्यवसाय करायचे. मसाल्यांमध्ये सडलेले तांदूळ, बाजरी, लाकडाचा भुसा,ऑसिड आणि अनेक रसायने यांचा वापर करण्यात येत होता. हे मसाले 50-50 किलोंच्या कार्टुन्समध्ये भरून विक्रीसाठी पाठवण्यात येत होते.