बाईकवर सुरू केला बिझनेस!

नोकरीसोबत आपला एखादा साईड बिझनेस असावा असे सगळय़ांनाच वाटते. आपले हेच स्वप्न अहमदाबाद येथील आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱया चार उच्चशिक्षित तरुणींनी पूर्ण केले आहे. या तरुणींनी आपली नोकरी सांभाळून अॅव्हेंजर्स अड्डा सुरू केलाय. आपल्या अॅव्हेंजर या बाईकवरच त्या आपला छोटासा सेटअप लावतात. मोईतो, बर्फाचा गोळा, कॉफी असे वेगवेगळय़ा प्रकारचे ड्रिंक्स ते विकतात. शुक्रवार ते रविवार यादरम्यान ते आपला स्टॉल लावतात. नुकताच सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्या या अनोख्या स्टार्टअपचे नेटिझन्सकडून कौतुक होतेय.