सरकारविरोधी गाण्यामुळे मृत्युदंड

 

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनकर्त्यांचे समर्थन करणे आणि सरकारविरोधात रस्त्यावर गाणे गायल्याने एका प्रसिद्ध
रॅपरला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. तुमज सालेही असे यारॅपरचे नाव आहे. सरकारविरोधात गाणे गायल्याने त्याला 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये बंद आहे. परंतु, आता त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेविरोधात वरच्या कोर्टात अपील करू, असे सालेहीचे वकील अमीर रईसियन यांनी सांगितले. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी रॅपरकडे केवळ 20 दिवस शिल्लक आहेत, असेही वकिलाने सांगितले. सालेहवर सरकारविरोधात खोटे प्रसार करणे आणि गाणे गाऊन दंगे भडकवणे यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.