भायखळ्यात रंगली उंबरठा करंडक स्पर्धेची अंतिम फेरी; ‘फ्लाइंग राणी’ने मारली बाजी

उत्कर्ष सेवा मंडळाची राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘उंबरठा करंडक 2023’ची अंतिम फेरी शनिवारी पार पडली.  या चुरशीच्या फेरीत कलामंथन, ठाणे यांनी सादर केलेल्या ‘फ्लाइंग राणी’ या एकांकिकेने ‘उंबरठा’ करंडक पटकावला. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक होते.

भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात ‘उंबरठा करंडक’ची अंतिम फेरी रंगली. या वेळी प्राथमिक फेरीतून निवडून आलेल्या सहा संघांच्या एकांकिका सादर झाल्या. यातून ‘फ्लाइंग राणी’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला, तर गुरू नानक खालसा स्वायत्त महाविद्यालयाच्या ‘लोकल पार्लर’ने द्वितीय क्रमांक पटकावला. नाटय़ परिवार, ठाणेच्या ‘पडदा’ एकांकिकेला तिसरा क्रमांक मिळाला.

अंतिम फेरीचे परीक्षक ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव आणि लेखक-दिग्दर्शक अंबर हडप होते.

स्पर्धेचा निकाल याप्रमाणे

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका
  • प्रथम क्रमांक – फ्लाइंग राणी (कलामंथन, ठाणे)
  • द्वितीय क्रमांक –  लोकल पार्लर (गुरू नानक खालसा स्वायत्त महाविद्यालय )
  • तृतीय क्रमांक- पडदा (नाटय़ परिवार, ठाणे)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
  • विजय पाटील (फ्लाइंग राणी)
  • सर्वोत्कृष्ट लेखक मोहन बनसोडे (फ्लाइंग राणी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेताओमकार परब (लोकल पार्लर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निकिता घाग  (फ्लाइंग राणी)
  • लक्षवेधी अभिनेतादीपक जोईल (फ्लाइंग राणी)
  • लक्षवेधी अभिनेत्रीसाक्षी मंचेकर आणि आदिती जमधरे (पडदा)
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्यकारविशाल भालेकर (फ्लाइंग राणी)
  • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनाकारराजेश शिंदे (खुदिराम)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत शुभम राणे (फ्लाइंग राणी)
  • सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार नाटय़ाश्रय (लोकल पार्लर )
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषाकारसिद्धी चिखलकर (लोकल पार्लर)