पाणी जपून वापरा, मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणीकपात

पालिकेला पाणीपुरवठा करणार्‍या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. सदर तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणार्‍या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.