Video किरीट सोमय्या यांची बोलती बंद, शपथविधीवर प्रतिक्रिया न देताच निघून गेले

भाजप नेते किरीट सोमय्या हे विरोधकांवर बेताल आरोप करत असतात. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यावरही गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. दरम्यान आता आरोप झालेले हे दोन्ही नेते आता भाजप व मिंधे गटाच्या सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांची अक्षरश: बोलतीच बंद झाली. सोमवारी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीवर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रीया विचारली. त्यावर त्यांनी काहीच उत्तर न देता तेथून निघून जाणेच सोयीचे समजले. त्यामुळे चिडीचूप झालेल्या सोमय्या यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी देखील त्यांची फिरकी घेताना दिसत आहेत.