मणिपुरात तीन जणांच्या मृत्यूनंतर तुफान जाळपोळ, मोर्टारने हल्ला, सकाळपासून गोळीबार सुरू

मणिपूररात सुरक्षा दल आणि मैतेई समाजात गेल्या 24 तासांपासून तुफान राडा सुरू आहे. यादरम्यान तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हिंसाचार वाढला आहे. हा हिंसाचार टेराखोंगसांगबी कांगवे आणि थोरबुंग या ठिकाणी झाला. हा परिसर कुकी-मैतेई यांच्यातील सीमादरम्यानचा आहे.

या हिंसाचारात ज्या तीन लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे समोर आली आहेत. जितेने मैतेई (46), युमनम पिशाक मैतेई (67) आणि युमनम प्रेमकुमार मैतेई (39) अशी नावे आहेत. हे सर्व जण क्वाक्टा लामल्हाई येथील रहिवासी आहेत. हल्लेखोर बफर झोन क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत होते. सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी गोळीबार केला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. यानंतर हिंसाचारात वाढ झाली. थोरबंग परिसरात डोंगराळ भागातून सकाळपासून गोळीबार केला जात आहे. मोर्टारने हल्ला केला. जमावाने अनेक मार्ग जाम केले आहेत