साप्ताहिक राशीभविष्य -रविवार 09 जुलै ते शनिवार 15 जुलै 2023

>>नीलिमा प्रधान

मेष – मैत्रीच्या नात्याने वागा
बुध, प्लुटो प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग. एखादे कटू सत्य तुम्ही सांगाल आणि अडचणी वाढवून ठेवाल. मैत्रीच्या नात्याने सर्वांशी वागणे हितावह ठरेल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात वाढ होईल. गिर्हाईक कायम ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नविन परिचयाने आत्मविश्वास वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल.
शुभ दिनांक : 11, 14

वृषभ – कामे मार्गी लावा
सूर्य, चंद्र लाभयोग. बुध, प्लुटो प्रतियुती. गैरसमज, नाराजी, वाद होतील. नोकरीत वरिष्ठ स्तुती करतील. नवे काम स्पर्धात्मक असेल. धंद्यात भेट, चर्चा यशस्वी ठरेल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्या गोष्टी शिकावयास मिळतील. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेऊ नका. लोकप्रियता लाभेल.
शुभ दिनांक: 9,10

मिथुन – बढती मिळेल
बुध, नेपच्युन त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग. किचकट कामे लवकर संपवा. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. बढती मिळेल. धंद्यात लाभ होईल. पैशांची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. घर, दुकान, जमिन खरेदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नाराजी संपवा. कामात प्रगती होईल. कला, साहित्यात चमकाल.
शुभ दिनांक: 9, 10

कर्क – अहंकार दूर ठेवा
चंद्र, गुरू युती, बुध शनि षडाष्टक योग. प्रेमाने, समजुतीने बोला. अहंकाराची भाषा तेढ निर्माण करेल. नोकरी टिकवा. व्याप सहन करा. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या शब्दाला मान देऊन कामे करा. वक्तव्य जपून करा. मान, प्रतिष्ठा जपा. वृद्धांची चिंता वाटेल.
शुभ दिनांक : 10, 11

सिंह – प्रसंगावधान ठेवा
सूर्य, हर्षल लाभयोग. बुध, प्लुटो प्रतियुती. आठवडय़ाची सुरूवात तणाव, चिंता देणारी ठरेल. कोणतेही, कुठेही वक्तव्य करताना प्रसंगावधान ठेवा. उतावळेपणा नको. कायदा मोडू नका. नोकरीत वरिष्ठांन खुष कराल. धंद्यात नम्रता ठेवा. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल.
शुभ दिनांक : 11, 14

कन्या – चर्चा यशस्वी होतील
बुध, प्लुटो प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग. रागावर ताबा ठेवा. व्यसन, मोह टाळा. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात चर्चा यशस्वी होईल. भागीदारी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. प्रतिस्पर्धी व जवळच्या व्यक्ती स्पर्धा करतील. गैरसमज पसरवतील. सावध रहा. प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिनांक : 9, 14

तूळ – कसोटीचा काळ
चंद्र, गुरू युती, सूर्य, चंद्र लाभयोग. सप्ताह कसोटीचा आहे. संयम, नम्रता ठेवल्यास यश दूर नाही. नोकरीत व्याप वाढला तरी प्रभाव राहील. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. दगदग, धावपळ वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. अधिकारप्राप्ती होईल. कोर्टाच्या कामात दिरंगाई नको. सावध रहा.
शुभ दिनांक : 11, 15

वृश्चिक – निर्णयाची घाई नको
चंद्र, गुरू त्रिकोणयोग, बुध, प्लुटो प्रतियुती. कोणत्याही निर्णयाची घाई नको. तुमच्या वागण्या, बोलण्याचा विपर्यास होईल. अहंकार नको. नोकरी टिकवा. नविन परिचय प्रेरणादयक ठरेल. धंद्याला कलाटणी मिळेल. वरिष्ठांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खोटय़ा प्रतिष्ठेपायी चूक होईल.
शुभ दिनांक : 9, 10

धनु – प्रगतीची संधी मिळेल
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सूर्य, हर्षल लाभयोग. सप्ताहाच्या शेवटी तणाव, गैरसमज होतील. बोलण्यात चूक करू नका. नोकरी, धंद्यात वर्चस्व राहील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तुमचा मुद्दा सौम्यपणे मांडा.कुटुंबात सुखद समाचार मिळेल. कायद्याच्या कक्षा लक्षात घेऊन कामे करा.
शुभ दिनांक : 11, 15

मकर – स्पर्धा करू नका
चंद्र, गुरू युती, चंद्र, बुध लाभयोग. कठीण प्रसंगांवर मात कराल. यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या. कायदा पाळा. पोटाची काळजी घ्या. नोकरीत राग वाढेल असे प्रसंग येतील. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा करण्यात वेळ घालवू नका. नेते, सहकारी यांचे विचार ऐका.
शुभ दिनांक : 9, 10

कुंभ – बोलण्यात चूक नको
सूर्य, चंद्र लाभयोग. बुध, शनि षडाष्टक योग. प्रतिष्ठा, मैत्री टिकवून ठेवा. बोलण्यात चूक करू नका. दूरगामी परिणामांचा विचार करा. कामाचे कौतुक होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टिका करताना घाई करू नका. योग्य निर्णयाच्या बाजूने उभे रहा. कलाटणी मिळेल.
शुभ दिनांक : 9, 10

मीन – निर्णयात सावधगिरी
बुध, नेपच्युन त्रिकोणयोग, चंद्र, गुरू युती. प्रत्येक दिवस कार्याला प्रगतीकारक ठरेल. मैत्रीतील तणावाकडे दुर्लक्ष करा. चतुराईने केलेले वक्तव्य प्रभावी ठरेल. धंद्यात मोह टाळा. हिशेबात चूक नको. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ राहून भूमिका ठरवा.
शुभ दिनांक : 10, 11