साप्ताहिक राशीभविष्य -रविवार 16 जुलै ते शनिवार 22 जुलै 2023

>>नीलिमा प्रधान

मेष – क्षुल्लक वाद होतील
मेषेच्या सुखस्थानात सूर्य, चंद्र, शुक्र युती. तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. क्षुल्लक वाद, तणाव होतील. नोकरीच्या कामात चर्चा करताना तारतम्य ठेवा. धंद्यात प्रगती होईल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची माणसे पाठीशी राहतील. स्पर्धेत जिद्द ठेवा. कौंटुबिक कामे होतील.
शुभ दिनांक : 21, 22

वृषभ – नोकरीत वर्चस्व राहील
वृषभेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, बुध युती. प्रत्येक दिवसात कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा. कोणताही गैरसमज मिटवून टाका. नोकरीत वर्चस्व राहील. कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचय होतील. पदाधिकार लाभेल. कला, साहित्यात प्रगती होईल.
शुभ दिनांक: 19, 20

मिथुन – सकारात्मक काळ
मिथुनेच्या धनेषात सूर्य, चंद्र, बुध युती. आत्मविश्वास, उत्साह वाढवणार्या व्यक्ती संपर्कात येतील. किचकट कामे करून घ्या. धंद्यात मोठी संधी लाभेल. नोकरीत बढतीचे योग. परदेशी जाण्याची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, चिंता कमी होईल. तुमचे मुद्दे कौतुकास्पद ठरतील. नवीन व्यवहार होतील.
शुभ दिनांक: 19, 21

कर्क – ताण कमी होईल
स्वराशीत सूर्य. सूर्य प्लुटो प्रतियुती. मनावरील ताण कमी होऊन तुमच्या कार्याला गती मिळेल. ठरविलेली कामे पूर्ण करा. नोकरीधंद्यात चांगली सुधारणा होईल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. विचारांची देवाणघेवाण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य होईल. स्पर्धेत अव्वल राहाल.
शुभ दिनांक : 21, 22

सिंह – कामाला महत्त्व द्या
सिंहेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र, मंगळ युती. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करू नका. कामाला महत्त्व द्या. नोकरीच्या कामात सतर्क रहा. धंद्यात गोड बोला. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वक्तव्य जपून करा. अहंकाराने नुकसान होईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. स्पर्धा कठीण आहे. व्यवहारात फसू नका.
शुभ दिनांक : 21, 22

कन्या – मोह टाळा
कन्येच्या एकादशात सूर्य, चंद्र, बुध युती. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीचा योग. भावना व कर्तव्य यांचा मेळ घालणे कठीण पडेल. खर्च वाढेल. मैत्री, नाते जपा. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात नाराजी होईल. मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती गैरसमज पसरवतील. कुटुंबात नाराजी होईल.
शुभ दिनांक :16, 19

तूळ – कामाचे नियोजन करा
तुळेच्या दशमेषात सूर्य, सूर्य प्लुटो प्रतियुती. प्रसंगावधान ठेवल्यास किचकट कामे करण्यात यश मिळेल. कामाचे नियोजन करा. कला, क्रिडा, साहित्यात प्रेरणादायक घटना घडेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात लाभ होईल. योग्य गुंतवणूक करा. पदाधिकार लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा होतील.
शुभ दिनांक : 19, 20

वृश्चिक – चांगली संधी लाभेल
वृश्चिकेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, बुध युती. बुद्धिचातुर्याने, प्रेमाने अनेक कामे करता येतील. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीधंद्यात चांगली संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा यशस्वी होईल. विशेष अधिकार मिळतील. कुटुंबात लक्ष द्या. खरेदी विक्रीत लाभ होईल. स्पर्धेत यशप्राप्ती होईल.
शुभ दिनांक : 19, 20

धनु – प्रकृतीची काळजी घ्या
धनुच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र, शुक्र युती. अहंपणाने मन जिंकणे शक्य नसते. थट्टामस्करी करताना प्रसंगावधान, तारतम्य ठेवा. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा नको. धंद्यात कठोर शब्द नको. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा पाळा. स्पर्धेत जिद्द ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 21, 22

मकर – कामाचा व्याप राहील
मकरेच्या सप्तमेषात सूर्य, सूर्य नेपच्युन त्रिकोणयोग. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाऊ नका. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. नोकरीत कामाचा व्याप राहील. धंद्यात पैसा सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती गैरफायदा घेतील. कोणताही मोह टाळा. प्रतिस्पर्धी डावपेच टाकतील.
शुभ दिनांक : 18, 19

कुंभ – कायद्याचे पालन करा
कुंभेच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र शुक्र युती. धावपळीत प्रकृती जपा. तुम्ही बांधलेला अंदाज, केलेला विचार चुकण्याची शक्यता आहे. कायदा पाळूनच शब्द वापरा. प्रेमाचे शब्दच तुम्हाला सर्वत्र यश देतील. दूरदृष्टिकोन ठेवा म्हणजे कोणतीही चूक होणार नाही. प्रतिष्ठा सांभाळा. नविन परिचय उत्साह वाढवतील.
शुभ दिनांक : 16, 21

मीन – वाद टाळा
मीनेच्या पंचमेषात सूर्य, सूर्य नेपच्युन त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. विरोधकांच्या गोड बोलण्यावर भाळू नका. नोकरीधंद्यात दुसर्यावर विसंबून राहू नका. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मित्र आपला शब्द फिरवतील. वरिष्ठ मोठी जबाबदारी देतील.
शुभ दिनांक : 18, 19