संस्थापक संपादक : बाळ ठाकरे | संपादक : उध्दव ठाकरे | कार्यकारी संपादक : संजय राऊत

आज दिवसभरातील ४ टॉप स्टोरीज

यापुढे बेकायदा बांधकामांना २०० टक्के दंड
यापुढे बेकायदा बांधकामांना २०० टक्के दंड
मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - मुंबईत वाढत चाललेल्या बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. ही बेकायदा बांधकामे शोधण्यासाठी पालिका ‘लीडार सर्व्हे’ करणार आहे. तसेच बेकायदा बांधकामांवर २०० टक्के दंड ठोठावला जाणार आहे. ....
वरळी कोळीवाडा सातासमुद्रापार!
वरळी कोळीवाडा सातासमुद्रापार!
मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी)-वरळी कोळीवाड्याचा समुद्राकडचा एण्ड, समोर काळ्या तटबंदीचा किल्ला आणि एका बाजूला साईबाबांचे पुरातन मंदिर... या परफेक्ट लोकेशनवरील एकमजली घर... रेडी...रोल अ‍ॅक्शन...कॅमेरा... असा आवाज शुक्रवारी घुमला आणि सुरू झाले हॉलीवूडपटाचे शूटिंग. ....
शेन वॉटसन ठरला धनकुबेर
शेन वॉटसन ठरला धनकुबेर
बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या सत्रातील लिलावातही क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसन या लिलावातील सर्वाधिक धनकुबेर क्रिकेटपटू ठरला. त्याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ कोटी ५० लाख रुपये मोजले. ....
हिमस्खलनात सातार्‍याचा जवान सुनील सूर्यवंशी शहीद
हिमस्खलनात सातार्‍याचा जवान सुनील सूर्यवंशी शहीद
सातारा / म्हसवड, दि. ६ (प्रतिनिधी) - सियाचीनमध्ये बुधवारी हिमकडा कोसळून शहीद झालेल्या ‘मद्रास रेजिमेंट’च्या दहा जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील मस्करवाडी (ता. माण) येथील सुनील विठ्ठल सूर्यवंशी (वय २९) यांचा समावेश आहे. ....

आणखी बातमी »

मुंबई

मराठी भाषा केंद्राचा प्रस्ताव सहा वर्षांपासून धूळ खात
मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - मराठीच्या जतन-संवर्धनासाठी सहा वर्षांपूर्वी ‘मराठी भाषा केंद्रा’चा ३०० कोटींचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर करण्यात आला. याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही. राजकीय अनास्थेमुळे ‘मराठी’ची कोंडी झाल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली.

पुणे

टेम्पोमधून डोकावणार्‍या सळया जिवावर बेतत नाहीत का?
पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - जीव वाचविण्यासाठी हेल्मेटसक्ती केल्याचे सांगितले जात असले, तरी लोखंडी गज, लाकडे आदी वस्तू वाहून नेणार्‍या ट्रक, टेम्पोंमधून त्या वस्तू धोकादायकरीत्या बाहेर आलेल्या असतात. शहराच्या मध्यवस्तीतून अशी धोकादायक वाहतूक रोज सर्रास सुरू असते.

पश्चिम महाराष्ट्र

वादाची ‘साडेसाती’ मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
नगर, दि. ६ (प्रतिनिधी) - शनिशिंगणापूर देवस्थानच्या शनि चौथर्‍यावरील महिलांच्या प्रवेशाबाबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. तर, देवस्थान व ‘भूमाता ब्रिगेड’च्या पदाधिकार्‍यांची काही मुद्द्यांवरून शाब्दिक चकमक झाली.

संभाजीनगर

दुचाकीवर मागे बसणार्‍यांनाही हेल्मेट सक्तीचे!
संभाजीनगर, दि. ६ (प्रतिनिधी) - आता दुचाकीवर मागे बसणारांनाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने यासंदर्भातील आदेश आज जारी केला. या आदेशाने दुचाकी खरेदी करतानाच दोन हेल्मेट खरेदी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मराठी भाषा केंद्राचा प्रस्ताव सहा वर्षांपासून धूळ खात

मराठी भाषा केंद्राचा प्रस्ताव सहा वर्षांपासून धूळ खात

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - मराठीच्या जतन-संवर्धनासाठी सहा वर्षांपूर्वी ‘मराठी भाषा केंद्रा’चा ३०० कोटींचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर करण्यात आला. याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही. राजकीय अनास्थेमुळे ‘मराठी’ची कोंडी झाल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली.

माळशेज येथे उभे राहणार ७०० मेगावॅटचे जलविद्युत केंद्र

माळशेज येथे उभे राहणार ७०० मेगावॅटचे जलविद्युत केंद्र

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - प्रदूषणविरहित ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलविद्युत ऊर्जेची जास्तीत जास्त निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ठाणे जिल्ह्यातील घाटघरनंतर आता माळशेज येथेही ७०० मेगावॅटचे जलविद्युत केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मालाडमध्ये आज ‘मुंबई ड्रीम्स’चा जल्लोष

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - थिरकणारी पावले... लयबद्ध पदन्यास... तरुणाईचा सळसळता उत्साह आणि वैभवशाली संस्कृतीचा रंगारंग आविष्कार उद्या मालाड, कुरार व्हिलेज येथे ‘मुंबई डी्रम्स’ कार्यक्रमात घडणार आहे.

मुंबई बँक सेंट्रल किचनसाठी बचत गटांना पाठबळ देणार

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - अत्याधुनिक सेंट्रल किचन बनवण्यासाठी अंगणवाडी आणि शालेय आहार पुरवणार्‍या महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देण्यात येईल. संस्थांच्या व ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या जातील, असे मत मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

टेम्पोमधून डोकावणार्‍या सळया जिवावर बेतत नाहीत का?

टेम्पोमधून डोकावणार्‍या सळया जिवावर बेतत नाहीत का?

पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - जीव वाचविण्यासाठी हेल्मेटसक्ती केल्याचे सांगितले जात असले, तरी लोखंडी गज, लाकडे आदी वस्तू वाहून नेणार्‍या ट्रक, टेम्पोंमधून त्या वस्तू धोकादायकरीत्या बाहेर आलेल्या असतात. शहराच्या मध्यवस्तीतून अशी धोकादायक वाहतूक रोज सर्रास सुरू असते.

हेल्मेटसक्ती विरोधात सर्वपक्षीय सरसावले

हेल्मेटसक्ती विरोधात सर्वपक्षीय सरसावले

पुुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - हेल्मेटसक्ती विरोधात शहरातील सर्वपक्षीय आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आज सरसावले. हेल्मेटवापराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, हेल्मेटसक्ती करणे हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे.

नथुराम कोणत्याही जातीतून येऊ शकतो

नथुराम कोणत्याही जातीतून येऊ शकतो

पुणे, दि. ६ (प्रतिनिधी) - मोदींच्या काळात दादरी हत्याकांड, कॉम्रेड पानसरे, डॉ. दाभोळकर, कलबुर्गी यांच्या हत्या होत असतील आणि पानसरे यांच्या हत्येमधील आरोपी समीर गायकवाड हा बहुजन असेल, तर ‘नथुराम’ कोणत्याही जातीतून येऊ शकतो, असा आरोप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला.

कायद्याला विरोध नाही; सक्ती का?

पुणे : कायद्याला विरोध नाही, तर सक्तीला विरोध आहे, असे म्हणत पुणेकरांनी हेल्मेटसक्तीला कडाडून विरोध केला आहे. हेल्मेटसाठी इतके आग्रही आहात, तर ज्या कारणांनी अपघात होतात ते रस्ते आधी दुरुस्त करा. ज्यांच्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली त्यांच्यावर काय कारवाई केली?

इसिसचा दहशतवाद रोखणार माहीम दर्ग्याचा अ‍ॅप

इसिसचा दहशतवाद रोखणार माहीम दर्ग्याचा अ‍ॅप

मुंबई, दि. ६ - इसिसच्या जाळ्यात अडकणार्‍या मुस्लिम तरुणांना रोखण्यासाठी आता थेट माहीमच्या हजरत मकदूम फकीअली माहीम दर्ग्याने कंबर कसली आहे. ‘इसिस’च्या वाढत्या दहशतवादी कारवायांचा अंत करण्यासाठी माहीम पीर मकदूमसाहब चॅरिटेबल ट्रस्टने एक अ‍ॅप बनवला आहे.

पंकज भुजबळ यांचाही पासपोर्ट जप्त

पंकज भुजबळ यांचाही पासपोर्ट जप्त

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - समीर भुजबळ यांना अटक केल्यानंतर ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी भुजबळ कुटुंबीयांभोवती चौकशीचा फास आता अधिकच आवळला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले असून देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

यापुढे बेकायदा बांधकामांना २०० टक्के दंड

यापुढे बेकायदा बांधकामांना २०० टक्के दंड

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - मुंबईत वाढत चाललेल्या बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. ही बेकायदा बांधकामे शोधण्यासाठी पालिका ‘लीडार सर्व्हे’ करणार आहे. तसेच बेकायदा बांधकामांवर २०० टक्के दंड ठोठावला जाणार आहे.

विशाखापट्टणमच्या समुद्रात हिंदुस्थानी नौदलाचे ‘शौर्य’

विशाखापट्टणमच्या समुद्रात हिंदुस्थानी नौदलाचे ‘शौर्य’

शंभराहून अधिक युद्धनौका, ६० फायटर प्लेन आणि लढाऊ जवान असा ताफा असणार्‍या हिंदुस्थानच्या नौदलाने शनिवारी विशाखापट्टणमच्या समुद्रात आपल्या शौर्य आणि शक्तीचे दर्शन घडविले.

जीवनगाणे : कसे प्यावे... त्यांचे सूर

जीवनगाणे : कसे प्यावे... त्यांचे सूर

सोशल मीडियामुळे प्रत्येकालाच आपले विचार मांडण्याचं एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. एका अर्थानं त्यामुळे विचारांचं एक लोकशाहीकरण झालं. रूढ माध्यमांची मक्तेदारी संपली आणि प्रत्येकाला आपापलं म्हणणं जगापुढे मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. पण यामुळे साहित्यचोरीही वाढली. इतरांच्या फेसबुकच्या पोस्ट, विनोद, कविता आपलंच साहित्य म्हणून लोक खपवू लागले.

खास बात : अंगठी रे...

खास बात : अंगठी रे...

स्टाईल सिम्बॉल झालेल्या टॅटूच्या प्रेमात लव्हबर्ड्स पडले असून एकमेकांची केवळ नावंच नव्हे तर कुठे भेटलो किंवा पहिल्या डेटच्या आठवणीची निशाणी कोरण्याची फॅशन सध्या बहरात आली आहे. अनामिकेत अंगठी घातली की वाञनिश्‍चय झाला असं समजायचा काळ गेला. आता टॅटूची अंगठी हा प्रेमातला नवा बदल आहे.

हौशीने शिकणार त्याला आयआयटी शिकवणार

हौशीने शिकणार त्याला आयआयटी शिकवणार

‘रट्टा मत मार... काबील बन, कामियाबी तो झक मार के पिछे आएगी...’ सिनेमातला डायलॉग तिथंच संपतो अन् तरुणाईचं रुटीन पुन्हा तसंच धावायला लागतं... तीच शाळा, तेच कॉलेज, तीच परीक्षा आणि तीच रट्टा मारण्याची स्टाईल... हे कुठेतरी बदलायला हवं... आयआयटीचे ‘काबील बन’ हे तत्त्व तरुणाईत रुजायला हवे. त्यासाठीच आयआयटीने ‘मुक्स’ कल्पनेला जन्म दिलाय... आयआयटीची कल्पना आहे... ती तेवढीच भन्नाट असणार!

अँकर : वाह पंडितजी

अँकर : वाह पंडितजी

हार्मोनियमच्या पट्ट्यावरून ज्यांची बोटे वयाच्या ८१व्या वर्षी आजही तरुणाईला लाजवतील अशा सफाईने फिरतात. संगीत हेच जीवन... त्याचीच उधळण करत तरुणाईच्या मनामनात संगीत रुजवणार्‍या पंडित तुळशीदास बोरकर यांना ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर त्यांच्या संगीतसुरांनी भारलेल्या गझलकाराने व्यक्त केलेली कृतज्ञता... वाह... पंडितजी वाह...!

रोखठोक : टिळक, आगरकर आणि खडसे!

रोखठोक : टिळक, आगरकर आणि खडसे!

टिळक-आगरकरांची पत्रकारिता इतिहासजमा झाली, पण त्याच महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्या रूपाने पत्रकारितेची नवी परंपरा उदयास आली. पाकिटे दिल्याशिवाय बातम्या छापल्या जात नाहीत, असे खडसे म्हणतात. त्यांचा कोणी साधा निषेध केला नाही. कारण खडसे खरेच बोलत आहेत.

लक्षवेधी : भरती-ओहोटीतला थरार

लक्षवेधी : भरती-ओहोटीतला थरार

मुरुड - जंजिरा येथील समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या पुण्यातल्या आबेदा इनामदार महाविद्यालयाचे १४ विद्यार्थी बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आणि पुन्हा एकदा समुद्रकिनार्‍यावरील सुरक्षितता, स्वत: घेण्याची खबरदारी याकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष यावर चर्चा सुरू झाली.

जातपंचायतीचा अमानुष विळखा

जातपंचायतीचा अमानुष विळखा

महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत जातपंचायतींबाबत सक्षम कायदा होणे गरजेचे आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. या कायद्याअभावी आज लाखो जीव अमानुष शिक्षेला, बहिष्काराला बळी पडत आहेत.

टिवल्या बावल्या : ओळख

टिवल्या बावल्या : ओळख

माझे ज्येष्ठ स्नेही व ‘साहित्यिक फिरक्या’ कार्यक्रमातील मान्यवर सहकारी (कै.) वि. आ. बुवा म्हणायचे, ‘समारंभात प्रमुख पाहुण्याची ओळख करून देणारा सोडून बाकी सगळे त्याला चांगला ओळखत असतात.’ अगदी खरं आहे.

शेन वॉटसन ठरला धनकुबेर

शेन वॉटसन ठरला धनकुबेर

बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या सत्रातील लिलावातही क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसन या लिलावातील सर्वाधिक धनकुबेर क्रिकेटपटू ठरला. त्याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ कोटी ५० लाख रुपये मोजले.

हिंदुस्थान उपांत्य फेरीत!

हिंदुस्थान उपांत्य फेरीत!

फतुल्लाह : ऋषभ पंतच्या धडाकेबाज १११ धावा... वॉशिंग्टन सुंदर व अनमोलप्रीत सिंगची अष्टपैलू चमक... व मयांक डागरच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने येथे सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमधल्या उपांत्यपूर्व फेरीत नामिबियाचा १९७ धावांनी धुव्वा उडवला.

निनाद, दत्तात्रेय, विजया यांना सुवर्णपदक

पुणे : महाराष्ट्राच्या निनाद पांगारे, दत्तात्रेय शेंडगे यांनी मुलांच्या, तर विजया दुधनी यांनी मुलींच्या गटात सुवर्णपदक जिंकून ६१व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेचा तिसरा दिवस गाजविला. महाराष्ट्राच्या राम धलपेला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुंबईने उडवला झारखंडचा धुव्वा

मैसूर : स्थानिक क्रिकेटमधील किंग समजल्या जाणार्‍या मुंबई क्रिकेट संघाने शनिवारी झारखंडचा ३९५ धावांनी धुव्वा उडवत अगदी रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला. डावखुरा फिरकी गोलंदाज इक्बाल अब्दुल्ला व ऑफस्पिनर जय बिस्ता यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने झारखंडचा दुसरा डाव ९४मध्येच गुंडाळला.

दहा महिन्यांत आरटीओची ३३० कोटींची कमाई

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) - वाहन खरेदीदारांची वाढती संख्या... मावळ, मुळशी, लोणावळा भागातील धनाढ्य... हौशा-गौशांकडून मिळणारा तुडुंब महसूल... यामुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या दहा महिन्यांत तीनशे तीस कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करा - आढळराव-पाटील

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) - सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करा. सामान्यांसाठी संघर्ष करून कामे करून घेण्याची धमक फक्त शिवसेनेतच असल्याचे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केले.

बनावट प्रमाणपत्राद्वारे भरती झालेल्या रेल्वे पोलीस शिपायावर गुन्हा

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) - खेळात विशेष प्रावीण्य मिळविल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून रेल्वे पोलीस दलात शिपाईपदावर भरती होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या पोलीस शिपायावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘हाय प्रोफाइल’ मोबाईल चोराच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या

‘हाय प्रोफाइल’ मोबाईल चोराच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) - कधी रुग्ण तर कधी ग्राहक बनून मोबाईल, एटीएमवर हात साफ करणार्‍या पिंपरीतील एका सुशिक्षित हाय प्रोफाइल चोराला वाकड पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीचे २२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.