पाहा व्हिडीओ-जादूमुळे अडकलं लफडेबाजाचं गुप्तांग ?

257

सामना ऑनलाईन, किटाले

बाहेरख्याली पणा करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कृत्यांची जबरदस्त शिक्षा भोगावी लागली आहे. घटना केनियातील किटाले शहरातील आहे. इथला ओगोंडो मुगाबे (बदललेले नाव)  या विवाहीत पुरुषाचे एका महिलेसोबत संबंध होते. एका हॉटेलमध्ये या दोघांनी एक रुम बुक केली होती. या रुममधून काही वेळाने जोरजोरात ओरडण्याचे आवाज ऐकू यायला लागले. हॉटेल कर्मचारी या आवाजामुळे घाबरले आणि त्यांनी खोलीचा दरवाजा त्यांच्याकडे असलेल्या चावीने उघडला. यावेळी त्यांनी जे बघितलं त्यावर त्यांचाही विश्वास बसत नव्हता.

अडकलेल्या अवस्थेतील ओगोंडो
अडकलेल्या अवस्थेतील ओगोंडो

ओगोंडो याचे गुप्तांग त्याच्या प्रेयसीच्या गुप्तांगामध्ये अडकलं आणि काही केल्या ते बाहेर येत नव्हतं. बराच वेळ झाल्यानंतर ओगोंडोला वेदना असह्य झाल्या आणि त्याने ओरडायला सुरूवात केली. तो इतक्या जोरात ओरडत होता की हॉटेलच्या खालून जाणाऱ्या लोकांनाही ते ऐकायला येत होतं.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने ही बातमी त्याच्या ओळखीच्यांना सांगितली आणि बघता बघता ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. हा प्रकार कसा घडला याची उत्सुकता असलेल्या मंडळींनी हॉटेलकडे धाव घेतली. हळूहळू हॉटेलखाली इतकी गर्दी झाली की पोलिसांना बोलवावं लागलं. गर्दी नंतर इतकी वाढली की पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. इकडे ओगोंडोची सुटका करण्यासाठी डॉक्टरांना बोलवावं लागलं.

या घटनेची माहिती पोलिसांनी लफडेबाज ओगोंडोच्या बायकोला दिली तेव्हा या सगळ्या प्रकाराची दुसरी बाजूही त्यांच्या लक्षात आली. आपला नवरा बाहेरख्याली आहे हे कळाल्याने ओगोंडोच्या बायकोने त्याला हे धंदे थांबव असा इशारा दिला होता. तरीही ओगोंडोची लफडी सुरू राहिल्याने त्याच्या बायकोने एका चेटकिणीला बोलावलं. या चेटकिणीने ओगोंडोवर काहीतरी काळी जादू केली ज्यामुळे त्याच्यावर ही अवस्था ओढवली असा दावा त्याच्या बायकोने केला आहे. ज्यामुळे पोलिसांना हसावं का रडावं हा प्रश्न पडलाय.

आपली प्रतिक्रिया द्या