
जम्मू-कश्मीरच्या रामबनमध्ये पोलीस तपासणी नाक्यावर शुक्रवारी पहाटे एक संशयास्पद स्कॉर्पिओ वाहन बॅरिकेड तोडून पसार झाले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशार देत तीन गोळ्या झाडल्या. तरीही चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि वाहनाचा वेग वाढवून नशरीच्या दिशेने पलायन केले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चंदरकोट येथील सुरक्षा तपासणी नाक्यावर ही घटना घडली. या घटनेनंतर, पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि लष्कराने संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. वाहनाचा शोध घेण्याचे आणि त्यातील प्रवाशांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, रामबन जिल्हा अमरनाथ यात्रेसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.


























































