राज्यात कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे पार वेशीवर टांगली, आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारवर घणाघात

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्येच केलेल्या गोळीबारावरून शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर ट्विट करीत मिंधे सरकारवर हल्ला चढवला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे पार वेशीवर टांगल्याचे नमूद करीत मिंधे गटाच्या गुंडगिरीच्या सहा गुह्यांची यादीच ट्विट केली आहे.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार ही केवळ एक झलक आहे. महाराष्ट्र राज्य हे भाजप पुरस्कृत सरकारने ताब्यात घेतले आहे. हा गोळीबार ही कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीची एक झलक आहे. गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल, असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. अशा सुसंस्कृत राज्यात गँगवॉर चालले असेल आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. मी हा प्रश्न सोमवारी संसदेत उपस्थित करेन तसेच गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गुंडगिरीच्या घटनांचा दाखला

– शुक्रवारी रात्री भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात मिंधे गँगच्या नेत्यावर गोळय़ा झाडल्या.

– मिंधे गँगच्या आमदाराने गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. नंतर पोलीस ठाण्यात त्याच्या बंदुकीतून गोळी झाडली. बॅलिस्टिक अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. या वागणुकीचे बक्षीस म्हणून त्यांना आता एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केले आहे.

– मिंधे टोळीच्या आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद. मुलगा नंतर होर्डिंगवर दिसला आणि घटना, पोलीस कारवाई नाही.

– मिंधे टोळीच्या आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली, तर इतरांची भाजपकडून शिकार केली जात होती. स्थानिक भाजप नेत्याने (2022 पर्यंत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते) कार्यकर्त्याला भेट दिली, पण पोलीस कारवाई झाली नाही.

कायद्याचे राज्य राहिले नाही – नाना पटोले

कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत आहेत यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे स्पष्ट होत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

गोळीबाराची घटना निषेधार्ह – जयंत पाटील

उल्हासनगर गोळीबाराची घटना अत्यंत आश्चर्यकारक व निषेधार्ह आहे. सरकार आणि गुंडामधील अंतर कमी झालेले आहे. आपण पाच गोळ्या झाडल्याचे आमदार स्वतःच सांगत आहेत, असे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

– कुटुंब खंडणीच्या मागण्या मान्य करत नसल्याने मिंधे टोळीचा एक नेता त्याचा मुलगा एका कुटुंबाला आणि मुलीला त्यांच्या घरात मारहाण करताना कॅमेऱयात कैद झाला. कारवाई नाही.

– ठाण्यातील मिंधे टोळीच्या स्थानिक नेत्यांनी आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या महिलेला मारहाण करून पोटात लाथ मारली, कॅमेऱयात कैद