जम्मू-कश्मीरच्या नौशेरात भूसुरुंग स्फोट; एक जवान शहीद, दुसरा जखमी

जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भूसुरुंगाच्या स्फोटात हिंदुस्थानी लष्कराचा एक जवान शहीद झाला तर दुसरा जखमी झाला आहे.

ही घटना 17 व्या शीख लाइट बटालियनच्या देखरेख क्षेत्रात (AOR) फॉरवर्ड डिफेन्स लाइन (FDL) पासून सुमारे 300 मीटर अंतरावर सकाळी 10:30 वाजता घडली.

हा स्फोट झाला तेव्हा लष्कराचे दोन जवान नियंत्रण रेषेजवळ नेहमी प्रमाणे निरीक्षण करत होते. स्फोटानंतर दोन्ही जवानांना तातडीने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींपैकी एका जवानाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.

लष्कराने अद्याप मृत जवानाचे आणि जखमी जवानाचे नाव जाहीर केलेले नाही.