Asian Games – हिंदुस्थानची पदकांची लयलूट सुरुच; नेमबाजीत ‘सुवर्ण’वेध, तर वुशूमध्ये रौप्यपदक

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये हिंदुस्थानच्या नेमबाजांचा दबदबा पहायला मिळत आहे. गुरुवाराही पदकांची लयलूट सुरुच ठेवत हिंदुस्थानच्या पुरुष संघाने 10 मीटर एअर पिस्टर क्रीडाप्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले. सरबजीत सिंग (Sarabjot Singh), अर्जुन सिंग चीमा (Arjun Singh Cheema) आणि शिवा नरवाल (Shiva Narwal) या तिकडीने ही कामगिरी केली.

दरम्यान, वुशूमध्ये हिंदुस्थानचे सुवर्णपदक हुकले. 60 किलो वजनी गटामध्ये रोशिबिना देवी (Roshibina Devi Naorem) हिला चीनची खेळाडू आणि गतविजेती वू जियोओ वेई हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे रोशिबिना हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हिंदुस्थानी नेमबाजांची कमाल, दोन सुवर्णांसह आठ पदकांची लयलूट

कोण आहे रोशिबिना?

रोशिबिना देवी हिचा जन्म मणिपूरच्या बिशनपूर जिल्ह्यात झाला. 2018 मध्ये आशियाची क्रीडा स्पर्धेत 60 किलो वजनी गटामध्ये तिने कांस्यपदक जिंकले होता. यंदा तिने आपल्या पदकाचा रंग बदलला असून रौप्यपदकावर नाव कोरले. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिचे अभिनंदन केले.

पदकांची संख्या 24 वर

दरम्यान, हिंदुस्थानच्या पदकांची संख्या 24 वर पोहोचली आहे. हिंदुस्थानने आतापर्यंत 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 10 कांस्यपदकांची कमाई केली आहे.