रवी किशन यांना मुलीचे वडील म्हणवणाऱया महिलेसह सहा जणांविरोधात गुन्हा

गोरखपूरमधून भाजपचे खासदार असलेले रवी किशन शुक्ला हे आपल्या मुलीचे वडील असल्याचा दावा करणाऱया महिलेसह सहा जणांविरोधात लखनऊच्या हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेसह सहा जणांनी रवी किशन यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. रवी किशन यांची पत्नी प्रीती शुक्ला यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री उशिरा संबंधित महिलेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.