हिंडेनबर्गने शेअर बाजाराचेही नुकसान केले -अदानी

gautam-adani

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे केवळ अदानी समूहाचीच पत गेली नाही, तर हिंदुस्थानच्या शेअर बाजाराचेही नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. खोटय़ा माहितीच्या आधारे आमच्या उद्योगसमूहाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न होता, असे गौतम अदानी यांनी अदानी एंटरप्रायझेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)ला दृकश्राव्य माध्यमाद्वारे संबोधित करताना सांगितले. हिंडेनबर्गचा अहवाल खोटा असून, आमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवून नफा कमावणे हाच या अहवालाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.