एफसीआयच्या निवृत्त कर्मचाऱयांना पेन्शन द्या! संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) हे महामंडळ असून निवृत्त होऊन 20 वर्षांहून अधिक काळ झालेल्या 5 हजारांहून जास्त कर्मचाऱयांना अजूनही पेन्शन मिळालेले नाही. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने एफसीआयच्या निवृत्त कर्मचाऱयांना पेन्शन सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय एफसीआय निवृत्त कर्मचारी संघटनेने आज पत्रकार परिषदेत केली.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे महामंडळ असून निवृत्त होणाऱया कर्मचाऱयांना पीएफ दिला गेला. मात्र, त्यांना इतर केंद्रीय कर्मचाऱयांप्रमाणे पेन्शनचा लाभ दिला जावा. याबाबत राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा आणि कर्मचाऱयांची पेन्शनची मागणी लावून धरावी, असे आवाहन अखिल भारतीय एफसीआय निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास उटगी यांनी केले आहे