देशात निर्माण होणार कंडोमची टंचाई?… अहवालाबाबत आरोग्य मंत्रालयाची प्रतिक्रिया

आगामी काही दिवसात देशात कंडोमची टंचाई निर्माण होणार असल्याचा दावा काही अहवालातून करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कुटंबनियोजनाच्या योजनेला बाधा पोहचण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्विसेस सोसायटी (सीएमएसएस) योग्यवेळी कंडोमचा पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचेही अहवालात म्हटले आहे. आता याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

देशात कंडोमची टंचाई निर्माण होण्याचे वृत्त प्रसारीत होत आहे. तसेच याबाबत काही अहवाल प्रसिद्ध झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, हे सर्व वृत्त भ्रामक आणि अयोग्य असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशात सध्या कंडोमचा स्टॉक आहे, तो देशातील कुटुंब नियोजनाच्या योजनेसाठी पुरेसा आहे. सीएमएसएस विविध योजनतंर्गत औषधे आणि गरजेच्या वस्तू खरेदी करते, त्याचा साठा आणि पुरवठा यावर त्यांची नजर असते. त्यामुळे अशाप्रकारची कोणतीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सीएमएसएसने मे 2023 मध्ये कुटुंब नियोजन योजनेतंर्गत 5.88 कोटी कंडोमची खरेदी केली आहे. तसेच सरकारकडे सध्या असलेला साठी कुटुंबनियोजनाच्या योजनेसाठी पुरेसा असल्याचे म्हटले आहे. लाइफकेयर लिमिटेड कंपनीकडून 75 टक्के मोफत कंडोमचा पुरवठा होतो. तर 2023-24 साठी मिळालेल्या मंजुरीच्या आधारे सीएमएसएस उर्वरीत 25 टक्के कंडोमचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे कंडोमच्या टंचाईबाबत येणारी वृत्ते भ्रामक असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.