कोरोनाने डोके वर काढले; 24 तासांत 355 कोविडबाधित

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह देशभरात अनेक भागांत थंडीने जोर धरला. परंतु या आल्हाददायक वातावरणासह कोविडनेही डोके वर काढल्यामुळे हिंदुस्थानवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल 355 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केली. यासोबतच देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती 1701 वर गेली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 33 हजार 316 जणांचा मृत्यू झाला असून रिकव्हरी दर 98.81 टक्के इतका आहे. कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत 220.67 कोटी लसी देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी सिंगापूरहून आलेल्या नागरिकामध्ये जेएन.1 हा कोरोनाचा नवा उपप्रकार आढळला. परंतु त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नसून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटले आहे.

केरळमध्ये आढळला उपप्रकार

केरळमध्ये 13 डिसेंबर रोजी नवीन कोरोना व्हायरल जेएन.1 हा प्रकार आढळून आला. हिंदुस्थानात कोरोनाची प्रकरणे वाढत असून त्यात या नव्या व्हेरिएंटचा समावेश असू शकतो, असे नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क पर्ह्सचे सह अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता रविवारी माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. यावेळी माहीम खाडीजवळ रेल्वे कर्मचाऱयांकडून दुरुस्तीची कामे करण्यात आली.