INDIA Meeting – इंडिया आघाडीच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. यातला पहिला निर्णय होता तो म्हणजे समन्वय समिती स्थापन करण्याचा. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत इंडिया आघाडीने समन्वय समितीची स्थापना केली असून त्यात 13 सदस्यांचा समावेश असणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे.

या बैठकीमध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाची प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल आणि समन्वय समिती जागावाटपासंदर्भातील निर्णय घेईल असे सांगण्यात आले आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिले आहे.