चांद्रयान 3 – इस्रोने शेअर केले अखेरच्या क्षणांच्या तयारीचे फोटो

हिंदुस्थानच्या ‘मिशन चंद्र’चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे ‘चांद्रयान-3’ मोहीमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यासाठी अवघी काही मिनिटं उरलेली असताना इस्रोने त्यांच्या मुख्यालयातील तयारीचे फोटो शेअर केले आहेत. शेवटच्या क्षणांमध्ये कार्यालयात सुरू असलेली गडबड त्या फोटोंमधून दिसून येतेय.

14 जुलै रोजी सुरू झालेली ही मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. बुधवार 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी या चांद्रयान मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार असून विक्रम लँडर चंद्रावर उतरेल.