मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने धरला हट्ट, आई ओरडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढत चालले आहे. मोबाईलवर कार्टुन आणि गेम्स खेळण्यामध्ये मुलं तासनतास रमतात. तर अनेक मुलं मोबाईल न दिल्याने हंगामाही करतात. अशातच पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने मोबाईल बघायला दिला नाही, त्यामुळे एका 12 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाच्या या पावलाने कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरच्या रायविंड शहरात 12 वर्षाच्या मुलाने आईकडे मोबाईलसाठी हट्ट धरला. मात्र हट्टाला पेटल्याने आई त्याच्यावर ओरडली. काही वेळाने काही कामासाठी त्याची आई बाहेर गेली होती. दरम्यान घरी आल्यावर पाहिले तर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. घरातल्या भितीवरील एका खांब्याला लटकून त्याने आत्महत्या केली.