Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीच्या संसदीय समितीची महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी खासदार पी. सी. चाको यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. यावेळी, संसदीय समितीचे सदस्य उपस्थित होते.