lok sabha election 2024 : मातंग समाजाचा महाविकास आघाडीला पाठिंबा  

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी देशभरातील लोकशाहीवादी राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मातंग संघाने (बी गट) शिवसेनेसह महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. संघाचे अध्यक्ष बी. जी. गायकवाड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

भाजप सत्तेत आल्यापासून देशात बेकारी, महागाई वाढत गेली आहे. त्यामुळे देशातील 80 टक्के लोक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहेत. त्यातच भाजपने विरोधकांना खोटय़ा प्रकरणांत तुरुंगात टाकले असून हुकूमशाही पद्धतीने देश आणि भाजपशासित राज्यात कारभार सुरू आहे. त्यातच संविधान बदलण्याची भाषा केली जात असल्यामुळे सर्वसामान्यही प्रचंड नाराज आहेत. मातंग समाजाने 2014 व 2019 सालीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून प्रचार केला होता.