‘मेल्यानंतर तरी आरक्षण मिळावे देवा’, चिठ्ठी लिहून मराठा समाजाच्या 2 कार्यकर्त्यांची आत्महत्या

मराठा समाजाला ओबीसीतून आऱक्षण मिळावे यासाठी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आता नांदेड जिल्ह्यात मराठा समाजाच्या दोन कार्यकर्त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार चाल ढकल करत आसल्याने मी मेल्यानंतर तरी समाजाला आरक्षण मिळावे देवा, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या करताना मराठा कार्यकर्त्यांनी लिहिली आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकवटला आहे. मात्र सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले. मात्र मराठा समाजाची मागणी ओबीसीतून आऱक्षणाची असल्याने तरुणांच्या आत्महत्या सुरुच आहेत. आता बळेगाव येथील भिवजी देविदास बेलकर (वय – 24) या तरुणाने जीव दिला आहे.

‘मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही. ओबीसी समाजातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मी मेल्यानंतर तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे देवा, अशी चिठ्ठी लिहून भिवजी बेलकर या तरुणाने गुरुवारी सकाळी गावातील अशोक बेलकर यांच्या मालकीच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

दुसरी घटना रानसुगाव येथे घडली असून येथील प्रकाश व्यंकटी जाधव (वय – 49) यांनी मराठा समाजाला आऱक्षण मिळत नाही म्हणून आपण आत्महत्या करत आहोत, अशी चिठ्ठी लिहून 20 मार्च रोजी रात्री गळफास घेतला. या दोन्ही ठिकाणी पंचनामे करून पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.