जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात, थोडक्यात बचावल्या

जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. अनंतनागकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातात मेहबुबा मुफ्ती आणि त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती पीडीपीच्या माध्यम प्रतिनिधींनी दिली आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.