भारतात बसून चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, मग EVM मार्फत मतदान कोणाला करायचं हे ठरवणं काय अवघड आहे?

आगामी वर्षात तेलंगणासह 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका, तसेच 2024मध्ये देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमधील फेरफारीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. तेलंगणामधील भाजप नेते आणि खासदार डी. अरविंद यांनी केलेल्या एका विधानामुळे हा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे.

देशातील निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून कशाप्रकारे सेटिंग लावली जाते याची धक्कादायक कबुलीच भाजप खासदार डी. अरविंद यांनी दिली आहे. ईव्हीएमवर नोटा, कार, हात यापैकी कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच जाणार आणि मोदीच जिंकणार, असे विधान अरविंद यांनी केले आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या हातात आयते कोलीत मिळाले असून जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सामना अग्रलेख – घोटाळ्यावर शिक्का!

भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं गेले आणि त्यात यशस्वी देखील झाले. मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचे हे ठरवणे काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं. विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.