केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सलग दुसऱया दिवशी निदर्शने

केजरीवाल यांचे चित्र असलेले मुखवटे आणि मै भी केजरीवाल तसेच मोदी का सब से बडा डर केजरीवाल, असे लिहिलेले पिवळ्या रंगाचे टी शर्ट घालून आज सलग दुस्रया दिवशीही केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीत तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली केजरीवाल यांना 21 मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी आपच्या नेत्यांनी हजारो कार्यकर्त्यांसह पंतप्रधानांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीतील मंत्री अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह विविध नेते आणि कार्यकर्त्यांनी आज दिल्ली विधानसभेसमोर तसेच सभागृहात मोदी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. देशात लोकशाही संपवण्याचे प्रयत्न केले जात असून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली, केजरीवाल यांना प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप अतिशी यांनी केला. विधानसभा अधिवेशनादरम्यान वेलमध्ये उतरून आपच्या आमदारांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

 केजरीकालप्रकरणी भारताची अमेरिकेकडे नाराजी

केजरीकाल यांच्याबाबत कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शी असाकी, असे भाष्य अमेरिकेच्या परराष्ट्र प्रकत्त्याने केल्यानंतर, आमच्या न्यायक्यकस्थेकर प्रश्न उपस्थित करू नका, असे भारताने अमेरिकेच्या प्रभारी अधिकारी ग्लोरिया बार्बेना यांना बोलाकून सांगितले. भारतीय परराष्ट्र अधिकाऱयांनी अमेरिकेच्या कक्तक्याबद्दल बार्बेना यांच्याकडे नाराजी क्यक्त केली. भारतातील कायदेशीर कारकाईबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र प्रकत्त्याचे किधान चुकीचे आहे. भारतातील कायदेशीर प्रक्रिया स्कतंत्र न्यायक्यकस्थेकर आधारित आहे. त्याची निंदा करणे किंका प्रश्न उपस्थित करणे मान्य केले जाणार नाही, असे भारताने म्हटले आहे.