आता विमानात स्वागत करणार AI एअर होस्टेस; कतार एअरवेजची अनोखी कल्पना…

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर हा सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. AI च्या मदतीने जगभरातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या नवीन शोध लावत आहेत. यातूनच नवनवीन उत्पादने तयार करत आहेत. ज्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत लक्षणीय बदल होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी केरळच्या शाळेत देशातील पहिली AI शिक्षिका पाहायला मिळाली होती. यातच आता कतार एअरवेजनेही आपली पहिली AI एअर होस्टेस सादर केली आहे. तिच नाव Saam2.0 अस ठेवण्यात आले आहे.

कतार एअरवेजने वेब समिट कतार या कार्यक्रमात एआय एअर होस्टेसच्या डेमोचे सादरिकरण केले होते. यानंतर आता IBT बर्लिन 2024 याठिकाणी ही एअर होस्टेस सादर केली आहे. हे एआय मॉडेल कोणत्याही मानवी एअर होस्टेसची जागा घेणार नसल्याचे कतार एअरवेजने स्पष्ट केले आहे. या AI मॉ़डेलचा वापर केवळ विमानातील प्रवाशांना प्रवासाचा अधिक चांगला अनुभव घेता यावा यासाठी विमानात केला जाणार आहे. कतार लिविंग या ट्विटर हॅंडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Sama 2.0 या एआय एअर होस्टेसला कतार एअरवेजने फ्लाइट अटेंडेंट म्हणून एक विशिष्ट ट्रेनिंग दिली आहे. एवढंच नाही, तर मीडिया आणि प्रवाशांशी संवाद साधण्याचे कौशल्यही या एआय मॉडेलमध्ये आहे. या एआयचं अपडेटेड व्हर्जन हे प्रवाशांच्या प्रश्नांना अगदी सोप्या भाषेत रिअल-टाईम उत्तरं देऊ शकेल.

&