झिलू सावंत यांचे निधन

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते झिलू कृष्णा सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कृष्णा व गजानन ही दोन मुले, रेखा, प्रतिभा व संध्या या तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे वृत्त समन्वयक गजानन सावंत यांचे ते वडील होत.

झिलू सावंत यांचा दांडगा जनसंपर्क होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल असोसिएशनचे त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शीव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.