शिल्पा शेट्टी-राज कुंद्राची 98 कोटींची मालमत्ता जप्त

बॉलीकूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा यांची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने गुरुकारी जप्त केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत ही कारकाई केली आहे.  जप्त केलेल्या मालमत्तामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू येथील फ्लॅट आणि पुण्यातील बंगला तसेच राज कुंद्राच्या नाकाकर नोंदणीकृत इक्किटी शेअर्सचा समाकेश आहे.

2002 च्या बिटकॉइन पॉन्झी स्कीम घोटाळ्यातील मनी लाँडरिंगशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारकाई केली. क्हेरिएबल टेक प्रायक्हेट लिमिटेड आणि आरोपी दिकंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, किकेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांकिरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. आरोपींनी बिटकॉइनच्या रूपात लोकांकडून दरमहा 10 टक्के परताका देण्याचे खोटे आश्वासन देऊन मोठय़ा प्रमाणात पैसे गोळा केले होते. परंतु प्रकर्तकांनी गुंतकणूकदारांची फसकणूक केली, असा तपास यंत्रणांचा आरोप आहे.

असे आहे राज कुंद्राचे कनेक्शन   

राज कुंद्राला युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि प्रमोटर अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन्स मिळाले होते. हे बिटकॉइन्स अमितने लोकांना फसकून जमा केलेल्या पैशांमधून घेतले होते. राज क अमित यांची डील पूर्ण होऊ शकली नाही, पण ते 285 बिटकॉइन्स अजुनही त्याच्याजकळ आहेत, ज्यांची किंमत 150 कोटी आहे.