
भारतीय प्रसारण दिन तसेच आकाशवाणी मुंबई केंद्र शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त गुरुवारी, 23 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता, रवींद्र नाटयमंदिर, प्रभादेवी येथे ’उत्सव नवचैतन्याचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात संगीतकार डॉ. वर्षा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली ’कलांगणचे छोटे मित्र’ बालगीतांची मैफल जागवतील. पाऊस आणि मनातील प्रेमभावना शब्दांत मांडणारे कवी मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेश्मा कारखानीस यांच्या कविता सादर होणार आहेत. अंकिता जोशी (गायन), निनाद मुळावकर (बासरी) आणि मंगेश जगताप (संतूर) हे आपल्या सुरांची बरसात करतील. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.






























































