कोहलीमध्ये अजूनही ‘विराट’ क्रिकेट बाकी, मास्टर ब्लास्टरचा विश्वास

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकेतून विराट कोहलीच्या माघारीचे वृत्त समोर आलेय. त्याच्या या निर्णयामुळे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विराट निवृत्त होतोय की काय, असा प्रश्नही सर्वांसमोर उभा ठाकलाय. पण कोहलीमध्ये अजूनही ‘विराट’ क्रिकेट बाकी आहे, ‘विराट’ धावा बाकी आहेत. देशाच्या विजयाची भूक आणि जास्तीत जास्त क्रिकेट खेळण्याची इच्छा त्याच्या धगधगतेय, असा दृढविश्वास व्यक्त केलाय ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने.

19 नोव्हेंबरला हिंदुस्थानी संघाकडून अब्जावधी चाहत्यांचे हृदय मोडले गेले, पण त्याने या वर्ल्ड कपमध्ये जोरदार कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. तो वन डे क्रिकेटच्या इतिहासात 50 शतके ठोकणारा ते पहिला फलंदाज ठरला. त्याच्या या विक्रमाबाबत सचिननेही गौरवोद्गार काढले. माझ्याकडून रचला गेलेला विश्वविक्रम एका हिंदुस्थानी खेळाडूकडे राहिल्याचा मला आनंद आहे. कोहलीकडे आजही हिंदुस्थानी क्रिकेटला देण्यासाठी सारेकाही ‘विराट’च आहे. त्याचा प्रवासही ‘विराट’ असेल. त्याच्याकडे खूप क्रिकेट बाकी आहे, त्याच्यात खूप धावा करण्याची इच्छा बाकी आहे. सचिनच्या या ‘विराट’ प्रतिक्रियेनंतर कोहलीबाबत चाहत्यांच्या मनात त्याच्या क्रिकेटबाबत कोणतीही शंका नसेल.

विराटची माघार; रोहितबाबत साशंकता, हिंदुस्थानचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून