शेअर बाजाराची सापशिडी सुरू; विक्रमी घसरणीनंतर पुन्हा तेजी

शेअर बाजारातील व्यवहार जोखमीचे असतात. बुधवारी शेअर बाजारात असाच अनुभव आला. बुधवारी बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. त्यानंतर बाजारात पुन्हा तेजी आली. त्यामुळे बाजारात आज सापशिडीचा खेळ सुरू असल्यासारखे वाटत होते. मुंबई शेअर बाजारातील 1,758 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर 620 शेअरमध्ये घसरण झाली. 223 शेअरला अप्पर सर्किट तर 20 शेअरला लोअर सर्किट लागले आहे.

मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची सुरुवातच घसरणीन झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 300 अंकांनी घसरला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीचा निर्देशांक 100 अकांनी घसरला होता. मिड कॅप, स्मॉल कॅप शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. मात्र, 11 वाजेनंतर बाजाराने तेजी पकडण्यास सुरूवात केली. त्यानंतर 12.15 पर्यंत बाजारा तेजीत होता. 11 वाजता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 73,851 वर आला होता. तेव्हा फक्त 52 अंकाची घसरण दिसत होती. तर 12.15 वाजेपर्यंत सुमारे 90 अंकांची तेजी दिसून आली. 11 वाजेनंतर निफ्टीनेही तेजी घेतली. त्यावेळी 24 अंकांनी घसरून निर्देशांक 22,428 वर आला होता. तर 12.15 वाजण्याच्या सुमारास निर्देशांकांत 15 अंकांची तेजी दिसत होती.

आयटी सेक्टरमध्ये तेजी दिसत असून मिडीया, मेटल, फायनान्स सेक्टरमध्येही तेजी आहे. तर पाएसयू बँक, बँक निफ्टी, हेल्थकेअर आणि ऑटो सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. अमेरिकी आणि आशियातील शेअर बाजाराची घसरण होत आहे. त्याचा परिणाम देशातील शेअर बाजारातही दिसत असल्याने आज बाजाराची सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. तसेच नंतर बाजाराने तेजी घेतली आहे. आगामी काही काळ बाजारात अनिश्चितता राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.