मुंबईच्या पावसाने सनी लिओनीच्या 3 गाड्यांची वाट लावली, 2 गाड्या एका दिवसात खराब झाल्या

पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलीवूडकडे वळालेली सनी लिओनी मुंबईत स्थायिक झाली आहे. मुंबई आणि मुंबईचा पाऊस तिला इतर मुंबईकरांप्रमाणे आवडतो. मात्र याच पावसामुळे माझ्या तीन महागड्या गाड्यांची पूर्णपणे वाट लागली असं सनीने सांगितलं आहे. दोन गाड्या तर एकाच दिवशी खराब झाल्याचे तिने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सनीने म्हटले आहे की, मुंबईत इतका पाऊस पडतो असे मला सुरुवातीला वाटले नव्हते. माझे घर हे समुद्रापासून जवळ असून सुरुवातीला पावसामुळे घरात सगळीकडे ओल धरत होती. ही ओल धरल्याने घरातील अनेक गोष्टी खराब होत होत्या.  या पावसामुळे आपल्या 3 गाड्या देखील खराब झाल्याचे तिने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

भलामोठा कर भरल्यानंतर परदेशातून या तीन गाड्या तिने मुंबईत आणल्या होत्या. या कारमध्ये 8 सीटर मर्सिडीझ ट्रकचाही समावेश होता. आपल्याला मुंबई आणि इथल्या पावसाची कल्पना नसल्याने विदेशातून गाड्या आणल्या होत्या, त्या इथला पाऊस  लक्षात घेऊन बनवलेल्या नसल्याने त्या लगेच खराब झाल्या. विदेशातून आणलेल्या दोन आलिशान गाड्या या एकाच दिवशी खराब झाल्याचे सनीने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


यातून धडा घेत सनीने हिंदुस्थानात बनलेल्या गाड्या घेतल्या असून आता या गाड्या पावसातही उत्तम धावतात असे तिने म्हटले आहे. गाड्यांचे नुकसान केल्यानंतरही सनीचा इथल्या पावसावर राग नाहीये. ती म्हणते की मला मुंबईचा पाऊस आवडतो. माझ्या मुलांनाही तो आवडतो आणि आम्ही सगळे मिळून पावसाचा आनंट लुटतो. इतर मुलांप्रमाणे माझ्याही मुलांना पावसात खेळायला आवडतं. मुले पावसात खेळताना आजारी पडू नये यासाठी त्यांना गमबूट आणि रेनकोट घालूनच मी त्यांना बाहेर पाठवते असं तिने म्हटलं आहे.