शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही राज्यसभेवर पाठवणार का? उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारला खणखणीत सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले की अशोक चव्हाण यांनी शहीदांच्या कुटुंबीयांचा अपमान केला. फडणवीस म्हणाले होते ते लीडर नाहीत डिलर आहेत. मग अशा डिलर सोबत आता कुणी डिल केली. आणित्यांना तुम्ही राज्यसभेवर पाठवताय. त्या माणसाला तुम्ही राज्यसभेवर पाठवणार असाल तर तुम्हीच शहीदांच्या कुटुंबीयांचा अपमान केला असं आम्ही मानू, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडलेल्या जाहीर सभेत केला. यावेळी त्यांनी गद्दार मिंधे गट, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्यावर टीका केली.

”छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने औरंगजेबासमोर झुकायला नकार दिला. संभाजीमहाराजांचे अनन्वित हाल करून त्यांची हत्या केली गेली. पण त्यांनी ताठ मानने सांगितलं की मान कापली तरी बेहत्तर पण मी इमान विकणार नाही. त्यांच्या छत्रपती संभाजीनगरात जे गद्दर आहेत ते आपला इमान विकूनबसले आहेत. हे कसले हिंदुत्ववादी. ते म्हणतात मी बाळासाहेबांचे विचार सोडले. पण बाळासाहेबांनी मी भाजपची पालखी वाहिन असं कधीच म्हटलं नव्हतं. आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. मोदींचे नाही. हिंदुत्व आम्ही कदापी सोडणार नाही”, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

”सध्या जो सुरू आहे तसा भ्रष्ट कारभार, गुंडागर्दीचा कारभार महाराष्ट्रात कधी पाहिला नव्हता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाणांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की या माणसाने शहीदांच्या कुटुंबीयांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले हा लीडर नाही डिलर आहे. मग या डिलरसोबत कुणी डिल केली? आणि त्या माणसाला तुम्ही राज्यसभेवर पाठवणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

”गेल्या सप्टेंबरमध्ये या शहरात मंत्रीमंडळाची बैठक घेतलेली. त्यावेळी 45 हजार कोटी जाहीर केलेले. त्यापैकी किती खर्च केले. किती योजना आणल्या ते कळू दे आम्हाला. नुसतं सोंग आणि ढोंग करायचं. आम्ही सत्तेत असताना शहराच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवत होतो, रस्त्याचा प्रश्न सोडवत होतो. गुठ्यांचा प्रश्न सोडवत होतो. तुम्ही काय केलं. तुमच्या सत्तेत नांदेड, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णालयात मृत्यू झाले आणि आता तुम्ही पालिकेच्या नावावने बोंबलतायत. शरम वाटली पाहिजे यांना. ज्या मुंबई मॉडेलचं कौतुक झालं त्या मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार झाला म्हणाताय शऱम कशी वाट नाही तुम्हााल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”मोदीजींनी भारतरत्नाचा बाजार मांडलाय. त्यांच्या मनात येईल त्यांना भारतरत्न दिलं तर त्यांच्या समाजाची मतं आम्हाला मिळतील असं त्यांना वाटतं. हरितक्रांतीचा जनक म्हणून स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. त्यांच्या आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या की शेतकरी जगला पाहिजे. त्या शिफारशी का नाही लागू करत. त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”गेल्या दीड दोन वर्षात ज्या काही आपत्ती आल्या, त्यावेळी पंतप्रधान आलेच नाही पण राज्य सरकारने किती मदत केल्या. आपल्या राज्यात येणारे उद्योग मोदी गुजरातला घेऊन गेले. आमचा गुजरातवर राग नाही. गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. सगळं गुजरातला. मोदीजी तुम्ही कळत नकळत गुजरात व संपूर्ण देशात भिंत उभी करताय. एक मोठं पाप तुमच्याकडून होतंय”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.