मैत्रिणीसोबत संबंध ठेवण्याची प्रेयसीची जबरदस्ती, विवाहित प्रियकराची वाट लागली

आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याने एका तरुणीने आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराचं गुप्तांग छाटलं आहे. गंभीर म्हणजे पीडित तरुणाचं तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू होतं.

ही घटना कानपूरच्या ग्रामीण भागातील चौबेपूर येथे घडली आहे. पीडित तरुण विवाहित आहे. त्याचे आरोपी तरुणीच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमध्ये हळूहळू प्रेयसीने आपल्या मैत्रिणीलाही सहभागी करून घ्यायला सुरुवात केली. रविवारी रात्री तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. तिने तिच्या मैत्रिणीला म्हणजेच आरोपी तरुणीला तिथे बोलवून घेतलं.

प्रेयसीची मैत्रीणही तिथे आलेली पाहून तरुण गोंधळला. आपल्या मैत्रिणीसोबतही त्याने संबंध ठेवावेत असं प्रेयसी त्याला सांगू लागली. पण, त्याने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीच्या मैत्रिणीने दाताने त्याच्या गुप्तांगाला चावा घेतला. तरुण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहोचला. त्याची अवस्था पाहून पत्नीने पोलिसांना पाचारण केलं.

हा प्रकार कळल्यानंतर पोलीसही अवाक झाले. त्यांनी तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. त्यानंतर त्याला कानपूर येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.