दीर्घायु भव -अष्टांग आयुर्वेद

>>वैद्य सत्यव्रत नानल

अनेकदा आयुर्वेदात अमुक एका रोगावर औषधे आहेत का? याचसोबत, आयुर्वेदात त्या रोगाबद्दल काही विचार आहे का? हे लोकांना समजून घ्यायचे असते. यासाठी म्हणून आज आपण आयुर्वेदात सगळ्या विषयांना कसे अंतर्भूत केले गेले आहे, कसा विचार केला जातो ते समजून घेऊ या. आयुर्वेदाने ‘आरोग्यविषयक’ आणि ‘रोगविषयक’ असे दोन्ही विचार हे सामान्य 8 विषयांत वर्गीकरण केलेले आहेत. ते विषय पुढीलप्रमाणे-

1) कायाचिकित्सा ः यामधे वैद्य औषधांनी चिकित्सा करणे शक्य असलेल्या सर्व रोगांचा विचार करतो आणि उपायही करतो. यात सामान्य जनरल प्रॅक्टिस करणाऱयांपासून ते विशिष्ट रोगांची चिकित्सा करण्यापर्यंत सर्व भाग अंतर्भूत होतात.

2) बाल चिकित्सा ः या वर्गात नुकत्याच जन्मलेल्या ताह्या बाळापासून ते 12 वर्षांपर्यंतच्या किशोर अवस्थेतील लहान मुलामुलींचा विचार होतो.

3) ग्रह चिकित्सा (भूत चिकित्सा) ः इथे पटकन ‘ग्रह’ शब्दाने ‘ज्योतिष’ वगैरे विचार डोक्यात येऊ शकतील किंवा ‘भूत’ शब्दाने ‘भुताटकी’ वगैरे गोंधळ वाढू शकतो, परंतु तसे नसून ‘ग्रह’ शब्दाने ग्रहण करणे, ताबा घेणे असा अर्थ अपेक्षित आहे. त्यात व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे विषयांपासून ते विविध विषप्रकार, मानसरोग आणि देव, दानव, गंधर्व, पिशाच अशा अनेक हेतूंमुळे उत्पन्न होणाऱया रोगावस्था आणि त्यांची चिकित्सा असा हा विषय आहे.

4) ऊर्ध्वांग चिकित्सा ः ऊर्ध्व अंग याचा अर्थ ऊर्ध्वजत्रुगत. छातीच्या पिंजऱयापासून वर डोक्यापर्यंत शरीराचा संपूर्ण एक तृतीयांश भाग, या भागात होणाऱया रोगांचा विचार. यात विशेषत्वाने सर्व ज्ञानेंद्रियांचा आणि त्यांच्या अवयवांचा (डोळे, नाक, कान, जीभ) आणि मनाचा विचार होतोच. सोबत मेंदूविषयकही अनेक रोगांचा विचार होतो. फुप्फुसे, हृदय यांचा विचारही या अनुषंगाने या वर्गात केला जातो.

5) शल्यचिकित्सा ः कोणत्याही प्रकारची ऑपरेशन्स करण्याची पद्धती म्हणजे शल्यचिकित्सा. आयुर्वेदात ऑपरेशन हा विषय अंतर्भूत आहे. ‘सुश्रुत संहिता’ हा ग्रंथ याच विषयावर आधारित आहे. सुश्रुतातील अनेक सर्जरींचे वर्णन केलेले ग्रंथातील भाग आज उपलब्ध राहिलेले नाहीत, परंतु तरीही अनेकविध छोटय़ा मोङ्गय़ा सर्जरीजचे वर्णन आजही मिळते आणि अनेक वैद्य त्यांचा वापर अगदी सोप्या पद्धतीने नियमितपणे आपापल्या दवाखान्यात आणि ऑपरेशन थेटरमध्ये आजही करतात. यात छोटे चामखीळ, पायाच्या भोवऱया वगैरेपासून ते शरीरात वाढणाऱया गाङ्गी, हाडे मोडणे वगैरेंचे ऑपरेशनचा विचार अंतर्भूत आहे. याचसोबत व्रण म्हणजे जखम झाल्यावर

6) दंष्ट्रा चिकित्सा (अगदतंत्र/विषचिकित्सा) ः यात विविध प्रकारची विषबाधा यांचा चिकित्सेसाङ्गी विचार केला जातो. प्राणिज, वनस्पतिज, खनिज वगैरे सर्व विष प्रकारांचा यात समावेश होतो. काळाच्या ओघात ही चिकित्सा पद्धतीसुद्धा मागे पडली आहे आणि बरेच नुकसान झाले आहे. या विषयात भरपूर सुंदर काम होणे शक्य आणि आवश्यक आहे.

7) जरा चिकित्सा (रसायन चिकित्सा) ः वार्धक्य येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु यौवन जास्तीत जास्त लांब आणि चांगल्या प्रकारे टिकवून ङ्खेवणे यासाङ्गी रसायन चिकित्सेचा विचार होतो. तसेच वार्धक्यातून पुन्हा यौवनाकडेही जाता येते. याने आयुष्य वाढते.

8) वृष्य चिकित्सा ः प्रजनन करण्यासाङ्गी संभोग ही क्रिया अत्यावश्यक असते. त्यासाङ्गी संभोग सामर्थ्यही आवश्यक असते. ते कमी पडू नये म्हणून वृष्य चिकित्सा केली जाते. याप्रमाणे आयुर्वेदामध्ये जीवनाच्या कोणत्याही काळात होणाऱया सर्व आरोग्यविषयक अवस्था आणि रोगांचा विचार केला जातो.

[email protected]