10 जूनपासून अॅपलचा इव्हेंट

टेक कंपनी अॅपलने आपला सर्वात मोठा इव्हेंट वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स काँन्फ्रेसच्या तारखेची घोषणा केली. कंपनीच्या माहितीनुसार, अॅपलचा इव्हेंट 10 ते 14 जून या दरम्यान होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी अनेक मोठय़ा घोषणा करण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा इव्हेंट ऑनलाइन केला जात होता; परंतु या वर्षी अॅपलचा इव्हेंट अॅपलच्या मैदानात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण ऑनलाइनसुद्धा केले जाणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आयओएस 18, आयपॅड ओएस 18, वॉच ओएस, टीव्ही ओएस, व्हिजन ओएस अॅडवॉन्स्डमेंट्ससाठी अपडेट आणि लेटेस्ट व्हर्जन लाँच करू शकते.