Lok Sabha Election 2024 : मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? अर्चना पाटील यांचा घराचा आहेर; अजित पवार गटाला घाम फुटला

माझा पती भाजपचा आमदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असे खळबळजनक वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या विधानाने पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देणार्‍या अजित पवार गटाला घाम फुटला आहे.

महायुतीमध्ये धाराशिवच्या जागेसाठी काथ्याकुट झाल्यानंतर ही जागा अजित पवार यांच्या गटाला सोडण्यात आली. धाराशिवच्या जागेसाठी तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे अखेर भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तातडीने प्रवेश देवून उमेदवारी जाहीर करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात आमनानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज त्या मतदारसंघातील बार्शी येथे भगवंताच्या दर्शनाला गेल्या होत्या.

यावेळी पत्रकारांनी बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आपण बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? असा प्रश्न विचारला. पत्रकारांच्या सरबत्तीने गोंधळलेल्या अर्चना पाटील यांना त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचा विसर पडला आणि ‘मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, मी महायुतीची उमेदवार आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मी उभी आहे. राजेंद्र राऊत महायुतीचे घटक आहेत. माझा पती भाजप आमदार असल्याचे त्या म्हणाल्या.

राजेंद्र राऊत अपक्ष आमदार

वास्तविक बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. ते देवेंद्र फडणवीस समर्थ आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे जे महायुतीत सहभागी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी वाढणार

आयत्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्चना पाटील यांना प्रवेश देउâन उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांही पदाधिकार्‍यांनी राजीनामे देखील दिलेले आहेत. त्यातच अर्चना पाटील यांच्या अशा वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी अधिकच वाढणार आहे.