साखरेचं व्यसन

>>अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

दारू, सिगारेट, तंबाखू, ड्रग्स यांच्याप्रमाणे साखरेचेदेखील व्यसन आहे हे कळले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याबद्दल आज जाणून घेऊ या.

ग्लुकोज आणि प्रक्टोज एकत्र आले की, सुक्रोजचे कण तयार होतात. सुक्रोज म्हणजे शुगर म्हणजेच साखर!

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर ही  निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. निसर्गाने आपल्याला ऊस दिला, फळं दिली, खजूर दिले, एवढेच नव्हे तर आपल्या प्रत्येक नैसर्गिक पदार्थामध्येदेखील नैसर्गिक साखर असते. खरं तर आपण नैसर्गिक साखर खाणं अपेक्षित आहे, पण आपण खातो ती पांढरीशुभ्र साखर! त्याच्यावर अतिप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे ती पचायला अत्यंत सोपी आणि सुलभ बनते.

आपल्या या बैठ्या जीवनशैलीमध्ये आपल्याला सुलभ आणि सोपी बसणाऱया साखरेची आवश्यकता आहे का? साखरेचं व्यसन लागतं तरी कसं? आणि आपणच आपल्या हाताने घरच्यांना, पोराबाळांना साखरेचे व्यसन सर्रास लावतो हे कितपत योग्य आहे?

आपल्याला हे माहिती आहे का की, पॅन्सरच्या पेशींना साखर खूप आवडते आणि त्याच्या जिवावर ते भसाभस वाढतात.  साखरेच्या सेवनाने लोकांना  वजन वाढणे, मधुमेह,  उच्च रक्तदाब,  दात खराब होणं, पोटात जंत होणं, आतडय़ातले चांगले जीवजंतू कमी होणं, इतपंच नव्हे तर मेंदूच्या कार्यक्षमतेवरदेखील याचा परिणाम होऊ शकतो.

गोड कसे कमी कराल…

पहिलं म्हणजे आपल्याला गोडाचं  प्रमाण कमी करायला हवं आणि त्यासाङ्गी प्रयत्नशील राहायला हवं.

हे सगळं खरं की, आपल्या शरीरातला हार्मोनल बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. सतत ताणतणाव असल्यामुळे कोर्टिसोलचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढलेले असते. तसंच रात्री जागून टीव्ही, मोबाईल बघणं आणि स्क्रीन टाईममुळे शरीरातील मेलाटोनिनदेखील कमी असते. या सगळ्या गोष्टींमुळे झोप कमी लागते. या सगळ्या गोष्टींमुळे सतत साखर खाण्याची इच्छा वाढीला लागते.

आपल्या शरीराला आहारातून थेट सेरिटोनिन  मिळत नाही, परंतु ट्रिपटोफिन असलेल्या पदार्थांना खाल्ले तर त्याच्यामधनं सेरिटोनिन तयार होतं. यासाङ्गी आहारामध्ये चांगली प्रथिने,  जसे की फिश, टोकू चीज, अक्रोड खायला पाहिजे. आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण ङ्खेवल्यासदेखील साखरेचे खाण्याची इच्छा कमी होते.

तुम्हाला जर खूप गोड खावंसं वाटत असेल तर घरामध्ये मिङ्गाईसारखे पदार्थ आणणं पहिल्यांदा बंद करा. तरीही जर गोड खावंसं वाटलं,  इच्छा झाल्यानंतर  काहीतरी  व्यायाम करणं किंवा घरातल्या घरात उडय़ा मारणं अशा प्रकारेदेखील आपण आपला मूड चेंज करू शकतो.

अगदीच गोड खावंसं वाटलं तर खजूर, अंजीर, मनुका असे गोड पदार्थ आपल्या हाताशी ङ्खेवावेत किंवा एखादा राजगिरा लाडू किंवा चिक्की खावी.

अशा प्रकारे आपल्याला आपल्या गोडाचे व्यसन कमी करता येऊ शकते.

व्यसन मोडायचं कसं?

थोडी तरी साखर शरीराला हवी असा खूप जणांचा गोड गैरसमज असतो. तसं अजिबात नसतं. कारण नैसर्गिक पदार्थांतून आपल्याला भरपूर साखर मिळतच असते, पण साखर एकदम बंद करायची नसेल तर हळूहळू ती कमी करणे हे जास्त योग्य आहे.

आपण एक नियम करू शकतो की, दिवसाला मी दोन किंवा तीन चमचे याच्यापेक्षा जास्त साखर घेणार नाही. तुम्ही म्हणाल की, आम्ही एवढीच साखर खातो, परंतु आपण जे वेगवेगळ्या प्रक्रिया केलेले पदार्थ स्वतः खात असतो किंवा मुलांना देत असतो, सॉस, बिस्कीट तसेच  हेल्थ ड्रिंकच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना फक्त साखर पाजणे हे कितपत योग्य आहे?

साखरेने आपली रोगप्रतिकारशक्तीदेखील खूप कमी होते.  साखर आणि गूळ जवळ जवळ एकाच  माळेचे मणी म्हटले पाहिजेत. थोडेसे पोषक तत्त्व असल्यामुळे साखरेपेक्षा गूळ बरा असं म्हणायला हरकत नाही. तरीही अति गोड खाण्याचं हे व्यसन मात्र आपल्याला कमी करायलाच हवं.