IPL 2024 – लय मिळवण्यासाठी धडपडतोय पंड्या

मुंबई इंडियन्ससोबत दुसऱयांदा जोडला गेल्यानंतर हार्दिक पंडय़ा यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ दोन सामने खेळला आहे. पण या दोन्ही सामन्यांत त्याच्यासमोर अनेक समस्या असल्याचे दिसले आहे. तसेच नेतृत्व करतानाही त्याच्यात सहजता दिसत नाही.

सध्याच्या राष्ट्रीय संघात सर्वाधिक सामने जिंकून देणाऱयांमध्ये एक असलेला अष्टपैलू Hardik Pandya त्याला मोठे करणाऱया संघात दुसऱयांदा सहभागी झाला आहे. पण यंदा आयपीएलमध्ये सलग दोन पराभवांमुळे तो अस्वस्थ दिसत आहे. हार्दिकला मुंबईचा सर्वात आवडता खेळाडू रोहित शर्मा याच्या जागी कर्णधार करण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल नाराजी आहे.

दोन्ही सामन्यांतील निकालांमुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे. दोन सामने, दोन पराभव आणि साधारण रणनीती यांमुळे हार्दिक अडचणीत आहे. त्यातच स्वतःचा फॉर्म खराब असल्यामुळे हार्दिकच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाला सध्या कोणताही धोका नाही. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक स्थानांतर रक्कम देऊन त्याला संघात आणल्यानंतर मुंबई इंडियन्सचे मालक तडकाफडकी कोणताही निर्णय घेण्यास तयार नाहीत. मुंबईचा संघ स्पर्धेत संथ सुरुवात करतो आणि लय मिळवण्यासाठी त्यांना वेळ लागतो. अशा परिस्थितीत हार्दिकला सुरुवातीलाच चुकीचा ठरवणे योग्य नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)