Lok Sabha 2024 – महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर 4 एप्रिलला अर्ज सादर करणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बुलढाणा लोकसभा उमेदवार नरेंद्र खेडेकर हे 4 एप्रिल 2024 गुरुवार रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नरेंद्र खेडेकर यांनी ‘सामना’शी बोलताना ही माहिती दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व अन्य मित्र पक्षाचे बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून नरेंद्र खेडेकर यांचे नाव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. त्यांचे नाव घोषित होताच जिल्ह्यात महाविकास आघाडीने एकच जल्लोष करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा निर्धार केला.

जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून 4 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या साक्षीने नरेंद्र खेडेकर बुलढाणा येथे अर्ज सादर करणार आहे. तेव्हा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.